AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणच्या या जागेला अमेरिका हातही लावू शकत नाही… एक चूक केल्यास जगात संतापाची लाट!

US vs Iran : इराणला गुडघ्यावर आणण्यासाठी अमेरिका आणि इस्त्रायल सतत हल्ले करत आहेत. मात्र इराणचे एक असा बेट आहे ज्याला डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पर्शही केलेला नाही. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

इराणच्या या जागेला अमेरिका हातही लावू शकत नाही... एक चूक केल्यास जगात संतापाची लाट!
iran kharg islandImage Credit source: Google
| Updated on: Mar 08, 2026 | 7:49 PM
Share

मध्य पूर्वेत मागील 9 दिवसांपासून भीषण युद्ध सुरू आहे. इराणला गुडघ्यावर आणण्यासाठी अमेरिका आणि इस्त्रायल सतत हल्ले करत आहेत. यामुळे इराणची एअर डिफेन्स सिस्टीन सुमारे 80% पर्यंत नष्ट झाली आहे. राजधानी तेहरानमधील शहरान इंधन डेपो जळत आहे, मेहराबाद विमानतळ उद्ध्वस्त झाला आहे, तसेच IRGC च्या मुख्यालयांमधून फक्त धूर निघताना दिसत आहे. संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. मात्र या प्रचंड विध्वंसाच्या काळातही इराणचे एक असा बेट आहे ज्याला डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पर्शही केलेला नाही. पर्शियन गल्फमधील एक छोटंसं खडकाळ बेट आजही पूर्णपणे सुरक्षित आहे. याकडे दुर्लक्ष करण्यात आलेले नसून हा निर्णय युद्धनीतीचा भाग मानला जात आहे.

खार्ग बेट – इराणच्या अर्थव्यवस्थेचा कणा

इराणमध्ये सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या काळातही खार्ग बेटावर आतापर्यंत कोणताही मिसाइल पडलेली नाही. खार्ग बेट हे केवळ एक खडकाळ बेट नाही, तर ते इराणच्या अर्थव्यवस्थेचे पॉवरहाऊस आहे. इराणचे जवळपास सर्व कच्चे तेल याच ठिकाणाहून जहाजांमध्ये भरले जाते. इराणच्या अर्थसंकल्पातील सुमारे 40% महसूल याच बेटावरून येतो. सरकारी खजिना आणि IRGC च्या सैनिकांचे वेतनही याच तेलाच्या उत्पन्नांतून दिले जाते.

अमेरिका-इस्त्रायल खार्ग बेटावर हल्ला का करत नाहीत?

  • इराणच्या खार्ग बेटावर फक्त जुनी HAWK मिसाइल प्रणाली तैनात आहे. त्यामुळे अवघ्या काही मिनिटात या बेटाचा विनाश केला जाऊ शकतो, मात्र खार्ग बेटाला हात न लावण्यामागे मोठी कूटनीती आहे.
  • खार्गवर हल्ला केल्यास आंतरराष्ट्रीय बाजारातून दररोज सुमारे 20 लाख बॅरल तेल गायब होऊ शकते. त्यामुळे ब्रेंट क्रूडची किंमत $150 प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकते, ज्यामुळे जगभरात गंभीर आर्थिक मंदी येऊ शकते.
  • चीन दररोज सुमारे 14 लाख बॅरल तेल इराणकडून घेतो. खार्गवर हल्ला झाला तर चीनला थेट युद्धात उतरायचे कारण मिळू शकते.
  • तेलाच्या किंमती वाढल्यास गरीब आणि विकसनशील देश या लष्करी मोहिमेविरोधात एकत्र येऊ शकतात. त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होऊन तिसरे जागतिक युद्ध भडकण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडू शकते

हे युद्ध इराणची लष्करी ताकद कमकुवत करण्यासाठी आहे, यामागे इराणले आर्थिकदृष्ट्या दिवाळखोर करण्याची योजना नाही. कारण इराणला दिवाळखोर केले तर जगातील अनेक अर्थव्यवस्थांना फटका बसू शकतो. इराणची सेना नष्ट केली जाऊ शकते, मात्र त्याचे तेल टर्मिनल जिवंत ठेवणे आवश्यक आहे. या कारणामुळेही इस्रायल आणि अमेरिका या बेटावर हल्ला करत नाही.

Follow Us
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना.
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती.
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या...
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या....
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा.
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.