LSG vs RCB IPL 2022: अरेरे, थोडक्यात हुकली Faf du plessis ची सेंच्युरी, पण क्लासिक बॅटिंगचा नजराणा

| Updated on: Apr 19, 2022 | 10:08 PM

LSG vs RCB IPL 2022: आयपीएल 2022 मध्ये फाफ डु प्लेसीच (Faf du plessis) शानदार प्रदर्शन सुरु आहे. आज लखनौ सुपर जायंट्स (Lucknow super Giants) विरुद्धच्या सामन्यात डु प्लेसीच्या खेळातून त्याची झलक दिसून आली.

LSG vs RCB IPL 2022: अरेरे, थोडक्यात हुकली Faf du plessis ची सेंच्युरी, पण क्लासिक बॅटिंगचा नजराणा
फाफ डु प्लेसिस
Image Credit source: IPL
Follow us on

मुंबई: आयपीएल 2022 मध्ये फाफ डु प्लेसीच (Faf du plessis) शानदार प्रदर्शन सुरु आहे. आज लखनौ सुपर जायंट्स (Lucknow super Giants) विरुद्धच्या सामन्यात डु प्लेसीच्या खेळातून त्याची झलक दिसून आली. डु प्लेसीच शतक थोडक्यात हुकलं. पण आज त्याने IPL मधली सर्वोच्च खेळी केली. शेवटच्या ओव्हरमध्ये डु प्लेसी आऊट झाला. पण तो पर्यंत त्याने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या (RCB) टीमला एका मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं होतं. जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मार्कस स्टॉयनिसने सीमारेषेवर त्याचा झेल घेतला. या सामन्यात टॉस जिंकून लखनौचा संघ प्रथम फलंदाजी करत होता. डु प्लेसीने आज कठीण परिस्थितीत त्याचा सर्वोत्तम खेळ दाखवला. आरसीबीचे टॉपचे चार फलंदाज 62 धावात तंबूत परतले होते. त्यांचा डाव अडचणीत होता. अशा परिस्थितीत डु प्लेसीने डाव सावरलाच पण संघाला एक भक्कम स्थितीमध्ये नेऊन ठेवलं.

डु प्लेसी 106 मिनिटं क्रीझवर होता

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध डु प्लेसी 106 मिनिटं क्रीझवर होता. त्याने 64 चेंडूत 96 धावा केल्या. यात 11 चौकार आणि दोन षटकार होते. या सीजनमधलं फाफ डु प्लेसीचं हे दुसर अर्धशतक आहे. याआधी डु प्लेसीने याच सीजनमध्ये पंजाब किंग्स विरुद्ध 88 धावांची खेळी केली होती.

ऑरेंज कॅपसाठी बटलर बरोबर स्पर्धा

लखनौ विरुद्धच्या 96 धावांच्या खेळीमुळे डु प्लेसी ऑरेंज कॅपच्या शर्यतीत जोस बटलर पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर आहे. ऑरेंज कॅप सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला दिली जाते. फाफने या सीजनमध्ये सात सामन्यात 250 धावा केल्या आहेत. बटलर धावांच्या बाबतीत खूपच पुढे आहे. त्याने 6 सामन्यात दोन शतकांसह 375 धावा केल्या आहेत.