LSG vs RCB Live Score, IPL 2022: बँगलोरचा लखनौवर ‘रॉयल’ विजय, फाफ डू प्लेसी ‘हिरो’

| Updated on: Apr 19, 2022 | 11:54 PM

Lucknow super giants vs Royal challengers Banglore live score in Marathi: दोन्ही संघ आपली विजयी लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील.

LSG vs RCB Live Score, IPL 2022: बँगलोरचा लखनौवर 'रॉयल' विजय, फाफ डू प्लेसी 'हिरो'
LSG vs RCB

LSG vs RCB, IPL 2022: IPL 2022 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने आज आपल्या पाचव्या विजयाची नोंद केली. त्यांनी लखनौ सुपर जायंट्स संघाला हरवलं. आरसीबीचा संघ गुणतालिकेत दुसऱ्ंया नंबरवर पोहोचला आहे. RCB ने लखनौला 18 धावांनी हरवलं. आरसीबीचा कॅप्टन फाफ डू प्लेसी आणि वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने विजयात महत्त्वची भूमिका बजावली. डू प्लेसीने (Faf du Plessis) चार बाद 62 अशा स्थितीतून डाव सावरला. त्याच्या 96 धावांच्या खेळीच्या बळावर RCB ने 181 धावांपर्यंत मजल मारली. बँगलोरने लखनौला विजयासाठी 182 धावांचे टार्गेट दिले होते. त्यांनी निर्धारीत 20 षटकात 8 बाद 163 धावा केल्या. जोश हेझलवूडने लखनौला रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने चार षटकात 25 धावा देत चार विकेट घेतल्या.

अशी आहे RCB ची Playing – 11

फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक, सुयश प्रभूदेसाई, शहाबाज अहमद, वानिंन्दु हसरंगा, जोश हेझलवूड, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज,

अशी आहे LSG ची Playing – 11

केएल राहुल (कॅप्टन), क्विंटन डि कॉक, मनीष पांडे, दीपक हुड्डा, आयुष बदोनी, मार्कस स्टॉयनिस, जेसन होल्डर, कृणाल पंड्या, आवेश खान, दुष्मंथा चमीरा, रवी बिश्नोई,

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 19 Apr 2022 11:33 PM (IST)

    बँगलोरचा लखनौवर ‘रॉयल’ विजय

    RCB ने LSG वर 18 धावांनी ‘रॉयल’ विजय मिळवला. बँगलोरने लखनौला विजयासाठी 182 धावांचे टार्गेट दिले होते. त्यांनी निर्धारीत 20 षटकात 8 बाद 163 धावा केल्या.

  • 19 Apr 2022 11:21 PM (IST)

    लखनौला 12 चेंडूत विजयासाठी 34 धावांची गरज

    18 षटकात लखनौच्या सहाबाद 148 धावा झाल्या आहेत. 12 चेंडूत विजयासाठी 34 धावांची गरज आहे. मार्कस स्टॉयनिस 24 आणि जेसन होल्डरची जोडी मैदानात आहे.

  • 19 Apr 2022 11:07 PM (IST)

    लखनौला विजयासाठी 24 चेंडूत 54 धावांची आवश्यकता

    16 षटकात आरसीबीच्या पाच बाद 128 धावा झाल्या आहेत. कृणाल पंड्या 42 धावांवर बाद झाला. आयुष बदोनी आणि स्टॉयनिसची जोडी मैदानात आहे. लखनौला विजयासाठी 24 चेंडूत 54 धावांची आवश्यकता आहे.

  • 19 Apr 2022 10:48 PM (IST)

    लखनौची चौथी विकेट

    लखनौची चौथी विकेट गेली आहे. दीपक हुड्डा 13 धावांवर आऊट झाला. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर प्रभुदेसाईने झेल घेतला. 12.3 षटकात लखनौच्या चार बाद 100 धावा झाल्या आहेत.

  • 19 Apr 2022 10:43 PM (IST)

    LSG शतकाच्या जवळ

    12 षटकात LSG च्या तीन बाद 99 धावा झाल्या आहेत. कृणाल पंड्या 38, दीपक हुड्डा 13 धावांवर खेळतोय.

  • 19 Apr 2022 10:31 PM (IST)

    10 षटकांचा खेळ पूर्ण

    10 षटकात आरसीबीच्या तीन बाद 83 धावा झाल्या आहेत. कृणाल पंड्या जबरदस्त फलंदाजी करतोय. त्याने 18 चेंडूत 31 धावा केल्या आहेत. यात तीन चौकार आणि दोन षटकार आहेत.

  • 19 Apr 2022 10:17 PM (IST)

    DRS चा कॉल यशस्वी, RCB ला मिळाली लखनौची मोठी विकेट

    आज लखनौ सुपर जायंट्सची खराब सुरुवात झाली. क्विंटन डि कॉकच्या रुपाने 17 धावांवर त्यांना पहिला झटका बसला. डि कॉकला तीन धावांवर हेझलवूडने मॅक्सवेलकरवी झेलबाद केलं. मनीष पांडेला हेझलवूडने हर्षल पटेलकरवी झेलबाद केलं. त्याने 6 धावा केल्या. त्यानंतर केएल राहुल आणि कृणाल पंड्याने डाव सावरला होता. पण आठव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर केएल राहुल 30 धावांवर आऊट झाला. हर्षल पटेलने ही विकेट घेतली.

  • 19 Apr 2022 09:48 PM (IST)

    लखनौच्या डावाला सुरुवात, डि कॉक-राहुलची जोडी मैदानात

    लखनौचा डाव सुरु झाला आहे. दोन षटकात त्यांच्या बिनबाद 14 धावा झाल्या आहेत. क्विंटन डि कॉक, केएल राहुलची जोडी मैदानात आहे.

  • 19 Apr 2022 09:24 PM (IST)

    लखनौला 182 धावांचे टार्गेट

    फाफ डू प्लेसिसच्या 96 धावांच्या खेळीच्या बळावर RCB ने लखनौला विजयासाठी 182 धावांचे टार्गेट दिले आहे. बँगलोरच्या डावात पाचव्या विकेटसाठी शहाबाज अहमद आणि डू प्लेसिसमध्ये सर्वाधिक 70 धावांची भागीदारी झाली. दिनेश कार्तिकने आठ चेंडूत नाबाद 13 धावा केल्या. यात एक षटकार होता.

  • 19 Apr 2022 09:20 PM (IST)

    शतकाच्या जवळ असताना डू प्लेसिस आऊट

    शतकाच्या जवळ असताना डू प्लेसिस 96 धावांवर आऊट झाला. त्याने 64 चेंडूत 96 धावा करताना 11 चौकार आणि दोन षटकार लगावले. होल्डरच्या गोलंदाजीवर स्टॉयनिसने झेल घेतला.

  • 19 Apr 2022 09:10 PM (IST)

    रवी बिश्नोईवर डू प्लेसिसचा हल्लाबोल

    रवी बिश्नोईने 18 वी ओव्हर टाकली. फाफ डू प्लेसिसने आपली फटकेबाजी कायम ठेवली. आरसीबीच्या पाच बाद 164 धावा झाल्या आहेत. या ओव्हरमध्ये दोन चौकार मारले.

  • 19 Apr 2022 09:04 PM (IST)

    डू प्लेसिस-कार्तिकची जोडी मैदानात

    17 षटकात आरसीबीच्या पाच बाद 150 धावा झाल्या आहेत. डू प्लेसिस 76 आणि दिनेश कार्तिक 3 धावांवर खेळतोय.

  • 19 Apr 2022 08:56 PM (IST)

    डू प्लेसिसची कॅप्टन इनिंग, शाहबाज अहमद रन आऊट

    चार विकेट गेल्यानंतर अडचणीत असलेला RCB चा डाव शहाबाज अहमद आणि कॅप्टन फाफ डू प्लेसिसने सावरला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. शाहबाज अहमद 26 धावांवर रनआऊट झाला. 15.2 षटकात आरसीबीच्या पाच बाद 132 धावा झाल्या आहेत. डू प्लेसिस 61 धावांवर नाबाद आहे.

  • 19 Apr 2022 08:19 PM (IST)

    स्टॉयनिसच्या ओव्हरमध्ये निघाल्या 14 धावा

    नववी ओव्हर मार्कस स्टॉयनिसने टाकली. शाहबाज अहमद आणि डू प्लेसिसची जोडी मैदानात आहे. 14 धावा या ओव्हरमध्ये आल्या. दोन चौकार लगावले. चार बाद 79 अशी आरसीबीची स्थिती आहे.

  • 19 Apr 2022 08:10 PM (IST)

    RCB ला चौथा झटका, सुयश प्रभूदेसाई OUT

    RCB ला चौथा झटका बसला आहे. सुयश प्रभूदेसाई 10 रन्सवर OUT झाला. जेसन होल्डरने त्याला पंड्याकरवी झेलबाद केलं.

  • 19 Apr 2022 08:06 PM (IST)

    गोव्याचा सुयश प्रभूदेसाई मैदानात

    सात ओव्हर्समध्ये आरसीबीच्या तीन बाद 62 धावा झाल्या आहेत. डू प्लेसीस 20 आणि सुयश प्रभूदेसाई 10 धावांवर खेळतोय.

  • 19 Apr 2022 08:01 PM (IST)

    रिव्हर्स स्विपचा फटका चुकला, धोकादायक मॅक्सवेल OUT

    जबरदस्त फलंदाजी करणारा ग्लेन मॅक्सवेल 23 धावांवर आऊट झाला आहे. त्याचा रिव्हर्स स्विपचा फटका चुकला. 11 चेंडूत त्याने 23 धावा केल्या. कृणाल पंड्याच्या गोलंदाजीवर त्याने होल्डरकडे झेल दिला. त्याने तीन चौकार आणि एक षटकार लगावला. पावरप्लेच्या सहा षटकात RCB च्या तीन बाद 47 धावा झाल्या आहेत.

  • 19 Apr 2022 07:49 PM (IST)

    चमीराच्या गोलंदाजीवर मॅक्सवेलचा हल्लाबोल

    दुष्मंथा चमीराने तिसरी ओव्हर टाकली. या षटकात ग्लेन मॅक्सवेलने हल्लाबोल केला. त्याने 19 धावा लुटल्या. मॅक्सवेल आणि डू प्लेसीसची जोडी मैदानात आहे. तीन ओव्हरमध्ये आरसीबीच्या दोन बाद 29 धावा झाल्या आहेत. मॅक्सवेलन तीन चौकार आणि एक षटकार लगावला.

  • 19 Apr 2022 07:41 PM (IST)

    LSG ची जबरदस्त सुरुवात

    LSG ने जबरदस्त सुरुवात केली आहे. दुष्मंथा चमीराने पहिल्याच ओव्हरमध्ये RCB ला दोन झटके दिले आहेत. अनुज रावतला 4 आणि विराट कोहलीला शुन्यावर बाद केलं. पहिल्या ओव्हरमध्ये लखनौची धावसंख्या दोन बाद 7 धावा आहे.

  • 19 Apr 2022 07:14 PM (IST)

    अशी आहे LSG ची Playing - 11

    केएल राहुल (कॅप्टन), क्विंटन डि कॉक, मनीष पांडे, दीपक हुड्डा, आयुष बदोनी, मार्कस स्टॉयनिस, जेसन होल्डर, कृणाल पंड्या, आवेश खान, दुष्मंथा चमीरा, रवी बिश्नोई,

  • 19 Apr 2022 07:12 PM (IST)

    अशी आहे RCB ची Playing - 11

    फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक, सुयश प्रभूदेसाई, शहाबाज अहमद, वानिंन्दु हसरंगा, जोश हेझलवूड, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज,

Published On - Apr 19,2022 7:10 PM

Follow us
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.
मराठा तरूणांसाठी दिलासा, MPSC पदभरतीत जागांची वाढ नवी जाहिरात प्रसिद्
मराठा तरूणांसाठी दिलासा, MPSC पदभरतीत जागांची वाढ नवी जाहिरात प्रसिद्.
दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल, तिघे निर्दोष तर किती आरोपींना जन्मठेप?
दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल, तिघे निर्दोष तर किती आरोपींना जन्मठेप?.
गद्दारी, दावोसचा दौरा अन गुलाबी थंडी; चतुर्वेदी- शिंदे गटात वार-पलटवार
गद्दारी, दावोसचा दौरा अन गुलाबी थंडी; चतुर्वेदी- शिंदे गटात वार-पलटवार.
कमळाऐवजी तुतारीच्या प्रचार, छगन भुजबळांवर शिंदेच्या आमदाराचा आरोप काय?
कमळाऐवजी तुतारीच्या प्रचार, छगन भुजबळांवर शिंदेच्या आमदाराचा आरोप काय?.
मतदानाचे 2 टप्पे बाकी अन् पवारांनी किती जागा जिंकणार केलं थेट भाकित
मतदानाचे 2 टप्पे बाकी अन् पवारांनी किती जागा जिंकणार केलं थेट भाकित.
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर.