AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कमळाऐवजी तुतारीच्या प्रचार, महायुतीत रंगलं वॉर; छगन भुजबळांवर शिंदेच्या आमदाराचा आरोप

कमळाऐवजी तुतारीच्या प्रचार, महायुतीत रंगलं वॉर; छगन भुजबळांवर शिंदेच्या आमदाराचा आरोप

| Updated on: May 10, 2024 | 10:51 AM
Share

सध्या कांदा प्रश्न दिंडोरी लोकसभेत सर्वात मोठा मुद्दा आहे. त्यात कांदेंविरोधात भुजबळांमध्ये कोण कोणाचा प्रचार करतंय यावरून वाद रंगलाय. छगन भुजबळ महायुतीत असूनही तुतारीचा प्रचार करताय, असा आरोपच शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केलाय. यावर भुजबळांनी काय केला पलटवार?

कमळाऐवजी तुतारीच्या प्रचारावरून दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीत वॉर रंगलंय. शिंदे गटाच्या शिवसेनेतील सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप करत भुजबळ तुतारीचा प्रचार करताय असं त्यांनी म्हटलं. तर भुजबळ समर्थकांचे फोटोही त्यांनी दाखवलेत. यावरून भुजबळांनी देखील सुहास कांदेंना पलटवार केलाय. सध्या कांदा प्रश्न दिंडोरी लोकसभेत सर्वात मोठा मुद्दा आहे. त्यात कांदेंविरोधात भुजबळांमध्ये कोण कोणाचा प्रचार करतंय यावरून वाद रंगलाय. छगन भुजबळ महायुतीत असूनही तुतारीचा प्रचार करताय, असा आरोपच शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केलाय. त्यावरून भुजबळही आक्रमक झालेत. आधीच कांद्याचा प्रश्न पेटलेला असताना दुसऱ्या कांदेंनी भाजपची अडचण करू नये, असा सल्लाच छगन भुजबळ यांनी सुहास कांदे यांना दिला. बघा स्पेशल रिपोर्ट…

Published on: May 10, 2024 10:51 AM