नकली संतान… मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज नाही वाटली
उद्धव ठाकरेंवर बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकली शिवसेनेनंतर नकली संतान अशी टीका केली. मोदींच्या टीकेवर उद्धव ठाकरेंनी पलटवार करत जोरदार हल्लाबोल केलाय. 'मोदीजी माझ्याशी लढा. माझ्या आई-वडिलांचा अपमान सहन करणार नाही. तुम्ही कुठे पण राहा. कोणीपण असा...'
उद्धव ठाकरे यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जहरी टीका केली आहे. मोदींकडून उद्धव ठाकरेंचा नकली संतान असा उल्लेख करण्यात आलाय. उद्धव ठाकरेंवर बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकली शिवसेनेनंतर नकली संतान अशी टीका केली. मोदींच्या टीकेवर उद्धव ठाकरेंनी पलटवार करत जोरदार हल्लाबोल केलाय. ‘मोदीजी माझ्याशी लढा. माझ्या आई-वडिलांचा अपमान सहन करणार नाही. तुम्ही कुठे पण राहा. तुम्हाला तुमची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. काय म्हणाले होतात तुम्ही, बाळासाहेबांच्या नकली मुलाला मी विचारात आहे. नकली?” हा माझा अपमान नाही, तर देवतासमान माझी आई आणि माझे वडील बाळासाहेब यांचा अपमान आहे.’, आज जे मोदी मला नकली मुलगा म्हणत आहे. 2014 आणि 2019 मध्ये माझी स्वाक्षरी घेताना लाज नाही वाटली का अशी जहरी टीका ठाकरेंनी मोदींवर केली. आता 17 मे रोजी हे लोकं मुंबईतील शिवाजी पार्कवर येतील. बाळासाहेबांच्या स्मारकावर पोहचतील. तिथे नाक रगडतील. मंचावर बाळासाहेबांच्या आठवणीत रडतील. हे नकली, बनावट लोक आहेत, असा हल्लाबोल ठाकरेंनी मोदींवर केला.
Published on: May 10, 2024 01:10 PM
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
