DC vs GT : दिल्लीचा थरारक विजयानंतर कॅप्टन ऋषभ पंतने काय म्हटलं?

| Updated on: Apr 25, 2024 | 12:26 AM

Rishabh Pant In Post Match Presentation : ऋषभ पंत याच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सवर मात करत आयपीएलच्या 17 व्या मोसमातील चौथा विजय मिळवला.

DC vs GT : दिल्लीचा थरारक विजयानंतर कॅप्टन ऋषभ पंतने काय म्हटलं?
sanjay manjarekar and rishabh pant,
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 40 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्लसने ऋषभ पंत याच्या नेतृत्वात शुबमन गिल याच्या कॅप्टन्सीतील गुजरात टायटन्सवर 4 धावांनी विजय मिळवला. दिल्लीचा हा या हंगामातील एकूण चौथा विजय ठरला. तर दिल्लीने या हंगामात दुसऱ्यांदा गुजरातला पराभवाचं पाणी पाजलं. दिल्लीने विजयासाठी दिलेल्या 225 धावांचा पाठलाग करताना गुजरातने अखेरच्या बॉलपर्यंत झुंज दिली. मात्र गुजरात अपयशी ठरली. गुजरातला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 220 धावाच करता आल्या. दिल्लीने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये 8 गुणांसह सहाव्या स्थानी झेप घेतली. दिल्लीच्या या विजयानंतर कॅप्टन ऋषभ पंत काय म्हणाला हे जाणून घेऊयात.

ऋषभ पंत काय म्हणाला?

“टी20 हा एक मजेदार खेळ आहे. सामन्यात 14-15 ओव्हरनंतर बॉल सहज येत होता. आज काम झाल्याचा आनंद आहे. मला बरं वाटतं. मैदानावरील प्रत्येक तास महत्त्वाचा आहे. मला मैदानावर वेळ घालवणं आवडतं. मी मैदानात 100 टक्के देण्याचा प्रयत्न करतो. सामन्यातील पहिला सिक्स मला खेळात आत्मविश्वास वाढवतो. मी जितका जास्त वेळ घालवतो तितकं मला चांगलं वाटतं”, असं पंतने विजयानंतर प्रोस्ट मॅच प्रेंझेटेशनमध्ये म्हटलं.

ऋषभ पंतची फटकेबाजी

दरम्यान ऋषभ पंतने गुजरात विरुद्ध 88 धावांची नाबाद खेळी केली. पंतने या खेळीदरम्यान 20 व्या ओव्हरमध्ये मोहित शर्माच्या बॉलिंगवर वाईडसह 31 धावा ठोकल्या. पंतने या 88 धावांच्या खेळीत 8 खणखणीत सिक्स आणि 5 फोर ठोकले. पंतने 204.65 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. पंतच्या या खेळीसाठी त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आलं.

पंत मॅन ऑफ द मॅच

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद आणि मुकेश कुमार.

गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, अझमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा आणि संदीप वॉरियर.