IPL 2024 LSG vs CSK Live Streaming : चेन्नईला विजयी हॅटट्रिकपासून लखनऊ रोखणार? कोण जिंकणार?

| Updated on: Apr 18, 2024 | 4:27 PM

Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Live Streaming :

IPL 2024 LSG vs CSK Live Streaming : चेन्नईला विजयी हॅटट्रिकपासून लखनऊ रोखणार? कोण जिंकणार?
lsg vs csk ipl 2024,
Follow us on

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 34 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने असणार आहेत. ऋतुराज गायकवाड चेन्नईचं नेतृत्व करणार आहे. तर केएल राहुल याच्याकडे लखनऊ सुपर जायंट्सचं कर्णधारपद सांभाळणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांचा हा सातवा सामना असणार आहे. याआधी खेळलेल्या 6 सामन्यातून चेन्नईने 4 सामने जिंकले आहेत. चेन्नई 8 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी विराजमान आहे.

तर लखनऊ सुपर जायंट्सने 6 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर 3 सामन्यात लखनऊ पराभूत झाली आहे. लखनऊ 6 गुणांसह पॉइंट्स टेबमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. लखनऊने गेले 2 सामने सलग गमावले आहेत. तर चेन्नईने सलग 2 सामने जिंकलेत. त्यामुळे चेन्नईला आता लखनऊ विरुद्ध विजयी हॅटट्रिकची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला लखनऊसमोर पराभवाची हॅटट्रिक रोखण्यासाठी चेन्नईवर विजय मिळवण्याचं आव्हान असणार आहे.

लखनऊ विरुद्ध चेन्नई सामना केव्हा?

लखनऊ विरुद्ध चेन्नई यांच्यातील सामना 19 एप्रिल रोजी होणार आहे.

लखनऊ विरुद्ध चेन्नई सामना कुठे?

लखनऊ विरुद्ध चेन्नई सामना भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियम, लखनऊ येथे खेळवण्यात येणार आहे.

लखनऊ विरुद्ध चेन्नई सामना किती वाजता सुरु होणार?

लखनऊ विरुद्ध चेन्नई सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.

लखनऊ विरुद्ध चेन्नई सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?

लखनऊ विरुद्ध चेन्नई सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.

लखनऊ विरुद्ध चेन्नई सामना मोबाईलवर फुकटात कुठे दिसणार?

लखनऊ विरुद्ध चेन्नई सामना मोबाईलवर फुकटात जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.

लखनऊ सुपर जायंट्स टीम : केएल राहुल (कर्णधार), युधवीर सिंग चरक, यश ठाकूर, मयंक यादव, मणिमारन सिद्धार्थ, शिवम मावी, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, शमर जोसेफ, डेव्हिड विली, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, काइल मेयर्स, प्रेराक मंकड, अर्शीन कुलकर्णी, दीपक हुड्डा, कृष्णा गौथम, एशटन टर्नर, निकोलस पूरन, देवदत्त पडिक्कल, क्विंटन डी कॉक, आयुष बडोनी, अमित मिश्रा, अर्शद खान आणि मोहसीन खान.

चेन्नई सुपर किंग्स टीम : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), एमएस धोनी, अरावेली अवनीश, रिचर्ड ग्लेसन, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मोईन अली, शिवम दुबे, आरएस हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय जाधव मंडल, डॅरिल मिशेल, रचीन रवींद्र, मिचेल सँटनर, दीपकुमार सिंधू, निशांत सिंधू. चहर, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना, सिमरजीत सिंग, प्रशांत सोलंकी, शार्दुल ठाकुर, महेश तीक्षना आणि समीर रिझवी.