Captaincy : रोहितला पुन्हा मिळणार जबाबदारी? हार्दिक पंड्या याची कॅप्टन्सी धोक्यात?

| Updated on: Mar 28, 2024 | 8:01 PM

IPL 2024 Mumbai Indians Captaincy : सलग 2 पराभव आणि त्यानंतर वाढत्या विरोधानंतर हार्दिक पंड्या याच्याकडे असलेली कर्णधारपदाची जबाबदारी काढून घेण्यात येणार असल्याची चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये आहे.

Captaincy : रोहितला पुन्हा मिळणार जबाबदारी? हार्दिक पंड्या याची कॅप्टन्सी धोक्यात?
Rohit And Hardik
Follow us on

आयपीएलच्या 17 व्या मोसमाआधी आणि आताही मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन्सीबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. मुंबई इंडियन्स फ्रँजायजीने रोहित शर्मा याला कर्णधारपदावरुन हटवून हार्दिक पंड्या याला नेतृत्वाची जबाबदारी दिली. रोहितला कर्णधारपदावरुन हटवल्यामुळे मुंबईकर आणि प्रामुख्याने मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण तयार झालंय. अशात हार्दिक पहिल्या 2 सामन्यात मुंबईला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. त्यामुळे हार्दिकला कर्णधारपदावरुन हटवा, अशी मागणी केली जात आहे.

मुंबईने आयपीएल 17 व्या हंगामातील आपला दुसरा सामना हा हैदराबाद विरुद्ध खेळला. हैदराबादच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांना फोडून काढत 250 पेक्षा अधिक धावा केल्या. हार्दिक या सामन्यात कॅप्टन म्हणून अपयशी ठरला. त्यामुळे सामन्यादरम्यान रोहितने हार्दिकला मदत केली. रोहितने फिल्डिंग लावायला मदत केली. मुंबईच्या पराभवानंतर दिग्गज माजी खेळाडूंनी हार्दिकच्या कॅप्टन्सीवर टीकाही केली. त्यामुळे हार्दिकला मुंबईची कॅप्टन्सी पेळवत नाहीये का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हार्दिकवर टीका होत असताना एक चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु झालीय. हार्दिकला हटवून रोहितला पुन्हा कर्णधारपद देणार असल्याची चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये सुरु आहे. या चर्चेचं कारण म्हणजे हैदराबाद विरुद्धच्या सामन्यानंतर व्हायरल झालेला फोटो. सामन्यानंतर रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सचा आकाश अंबानी यांच्यात चर्चा झाली. या फोटोमुळेच हार्दिकला कर्णधारपदावरुन हटवून रोहित शर्मा याला नेतृत्वाची जबाबदारी मिळणार? अशी चर्चा रंगू लागली आहे.

दरम्यान मुंबईला या हंगामातील आपला एकूण तिसरा आणि घरच्या मैदानातील पहिला सामना हा सोमवारी 1 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियममध्ये खेळणार आहे. राजस्थान रॉयल्ससमोर मुंबईचं आव्हान असणार आहे.

आकाश अंबानी-रोहित शर्मा यांच्यात चर्चा

मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेव्हिस, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, शम्स मुलानी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, ल्यूक वुड, नमन धीर, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, नेहल वढेरा, कुमार कार्तिकेय, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, आकाश मढवाल, नुवान तुषारा आणि क्वेना मफाका.