IPL 2024 : पहिल्या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सचे बारा वाजले, एकापाठोपाठ तीन धक्के

| Updated on: Mar 18, 2024 | 7:15 PM

आयपीएल स्पर्धेोतील पहिला सामना 22 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. या सामन्यापूर्वी चेन्नईच्या गोटात खळबळ उडाली आहे. सामन्याला अवघे काही दिवस उरले असताना तीन धक्के बसले आहेत.

IPL 2024 : पहिल्या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सचे बारा वाजले, एकापाठोपाठ तीन धक्के
Follow us on

मुंबई : आयपीएल 2024 स्पर्धेत पहिलाच सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. मात्र या सामन्यापू्र्वी चेन्नई सुपर किंग्स संघाचं टेन्शन वाढलं आहे. याला कारण ठरलं ते श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामना..या सामन्यात एकूण चार खेळाडू जखमी झाले आहेत. यापैकी दोघांना स्ट्रेचरवर नेण्याची वेळ आली. तर एका खेळाडूच्या दुखापतीचं गांभीर्य ओळखून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं आहे. यात चेन्नई सुपर किंग्सचा स्टार खेळाडू जखमी झाला आहे.दोन खेळाडू दुखापतींमुळे आधीच काही सामन्यांना मुकले आहेत.आता बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानची दुखापत खूपच गंभीर आहे. त्याला स्ट्रेचर वापरून मैदानाबाहेर काढण्यात आले.

श्रीलंकेचा संघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडली. यावेळी मुस्तफिजुर रहमानला शेवटच्या सामन्यात दुखापत झाली. मुस्तफिजुर रहमानला क्रॅम्पमुळे मैदान सोडावे लागले. 42व्या षटकातील शेवटचा चेंडू टाकताना जमिनीवर पडला. 48वं षटक टाकताना पहिल्याच चेंडूवर पडला. त्यानंतर स्ट्रेचरच्या साहाय्याने मैदानाबाहेर काढावे लागले. बांगलादेश क्रिकेटने मुस्तफिजुरच्या दुखापतीबद्दल अद्याप कोणतेही माहिती दिलेली नाही.

आयपीएल 2024 स्पर्धा सुरु होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्जच्या दोन खेळाडूंना दुखापतींचा सामना करावा लागला आहे. डेव्हॉन कॉनवे आणि मातिशा पाथिराना दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यामुळे या स्पर्धेत खेळणं कठीण असल्याचं बोललं जात आहे. कॉनवेला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत अंगठ्याला दुखापत झाली आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. न्यूझीलंडचा सलामीचा फलंदाज आयपीएल 2024 च्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.

चेन्नई सुपर किंग्ज : एमएस धोनी (कर्णधार), मोईन अली, दीपक चहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथीशा पाथीराणा, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सनजेल, शेख रशीद. सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, महेश थेक्षाना, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रहमान, अवनीश राव अरवेल्ली, डेव्हॉन कॉनवे.