PBKS VS MI Head To Head : पंजाब-मुंबई यांच्यात काटेदार सामना, पाहा दोघांचे आकडे

| Updated on: Apr 17, 2024 | 4:36 PM

Punjab Kings vs Mumbai Indians Head To Head Records : पंजाब आणि मुंबई दोन्ही संघ आयपीएलच्या 17 व्या मोसमातील एकमेकांविरुद्ध भिडण्यासाठी सज्ज आहेत. या दोन्ही संघापैकी वरचढ कोण आहे? जाणून घ्या.

PBKS VS MI Head To Head : पंजाब-मुंबई यांच्यात काटेदार सामना, पाहा दोघांचे आकडे
pbks vs mi huddle talk,
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 33 वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. हा सामना मुल्लानपूर, चंढीगड येथे होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल. पंजाब आणि मुंबई दोन्ही संघांची पॉइंट्स टेबलमधील स्थिती ही सारखीच आहे. मुंबई आणि पंजाब या दोन्ही संघांनी या हंगामात प्रत्येकी 6 सामने खेळले आहेत. पंजाब आणि मुंबईने 6 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर दोघांनीही पराभवाचा चौकार लगावला आहे. त्यामुळे प्लेऑफच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी उर्वरित सामने हे महत्त्वाचे असणार आहेत. पंजाब-मुंबई सामन्यानिमित्ताने उभयसंघांची एकमेकांविरुद्धची आकडेवारी कशी आहे, हे जाणून घेऊयात.

पंजाब विरुद्ध मुंबई हेड टु हेड रेकॉर्ड्स

पंजाब विरुद्ध मुंबई दोन्ही संघ एकूण 31 सामन्यात आमनेसामने आले आहेत. या 31 सामन्यात दोन्ही संघांची जवळपास तोडीसतोड कामगिरी राहिली आहे. मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सचा 16 सामन्यात धुव्वा उडवला आहे. तर पंजाब किंग्सने 15 वेळा विजय मिळवला आहे. एका विजयाचा अपवाद वगळल्यास दोन्ही संघांमध्ये तुल्यबळ लढाई झालेली आहे. तसेच 16 व्या मोसमात या दोन्ही संघांमध्ये 2 सामेन झाले होते. तेव्हाही दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकला होता. त्यामुळे 18 तारखेला होणाऱ्या सामन्यात चाहत्यांना चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

पंजाब किंग्स टीम : शिखर धवन (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो, हरप्रीत सिंग भाटिया, प्रभसिमरन सिंग, रिली रोसो, जितेश शर्मा (विकेटकीपर) , सॅम कुरान, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, शिवम सिंग, सिकंदर रझा, अथर्व तायडे, ख्रिस वोक्स, अर्शदीप सिंग, राहुल चहर, नाथन एलिस, हरप्रीत ब्रार, विद्वथ कवेरप्पा, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, प्रिन्स चौधरी, आशुतोष शर्मा, विश्वनाथ सिंग आणि तनय त्यागराजन.

मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.