IPL 2024 : राजस्थान रॉयल्सला बसला धक्का, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू स्पर्धेत खेळणार नाही

| Updated on: Mar 21, 2024 | 9:55 PM

आयपीएल 2024 स्पर्धेचं बिगुल वाजलं असून नव्या विजेता दोन महिनानंतर मिळणार आहे. यासाठी दहा संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. असं असताना स्पर्धेला अवघे काही तास शिल्लक असताना दिग्गज खेळाडूने स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्स संघाची त्रेधातिरपीट उडणार आहे.

IPL 2024 : राजस्थान रॉयल्सला बसला धक्का, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू स्पर्धेत खेळणार नाही
IPL 2024 : राजस्थान रॉयल्स ऐनवेळी त्रेधातिरपीट, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडू स्पर्धेतून बाहेर
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेला अवघे काही तास शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू स्पर्धेतून माघार घेण्याच्या तयारीत आहे. एडम झाम्पा वैयक्तिक कारणामुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. गेल्या वर्षी लिलावापूर्वी राजस्थान रॉयल्स संघाने 1.5 कोटी रुपयांना घेतलं होतं. त्यानंतर त्याला संघात कायम ठेवलं होतं. मात्र वैयक्तिक कारणामुळे माघार घेतल्याची माहिती ईएसपीएनक्रिकइन्फोला दिली आहे. फिरकीपटू राजस्थान रॉयल्स संघाचा भाग आहे. मागच्या पर्वात सहा सामने खेळला आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 22 धावा देत तीन गडी बाद केले होते. तर स्पर्धेत एकूण 8 गडी बाद केले होते. एडम झाम्पाने आयपीएल करिअरमधील 20 सामन्यात 29 गडी बाद केले आहेत.

भारत दौऱ्यानंतर बिग बॅश लीगमध्ये सहभागी झाला होता. तसेच वेस्ट इंडिज, न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतही केळला होता. त्यामुळे व्यस्त शेड्युलनंतर झाम्पाने कुठेतरी थांबण्याचा विचार केला आहे. आता आपल्या कुटुंबासोबत काही वेळ व्यतित करण्याची इछा आहे. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णानंतर स्पर्धेला मुकणारा दुसरा गोलंदाज आहे. आता त्याच्या जागी कोणता खेळाडू संघात सहभागी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

एडम झाम्पाची उणीव तशी राजस्थान रॉयल्स संघाला भासणार नाही. कारण राजस्थान रॉयल्स संघात आर अश्विन आणि युझवेंद्र चहल देखील आहेत. हे दोन्ही दिग्गज फिरकीपटू आहेत. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये तिसऱ्या फिरकीपटूला जागा मिळवणं तसं कठीणच होतं. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघ या पर्वाचा पहिला सामना लखनऊ सुपरजायंट्सविरुद्ध 24 मार्च रोजी जयपूर येथे खेळणार आहे. यानंतर 28 मार्च रोजी संघ दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामना खेळणार आहे.

राजस्थान रॉयल्सचा संघ : संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, डोनोवन फरेरा, कुणाल राठोड, रविचंद्रन अश्विन, कुलदीप सेन, नवदीप सैनी, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, अवेश खान , रोव्हमन पॉवेल, शुभम दुबे, टॉम कोहलर-कॅडमोर, आबिद मुश्ताक, नांद्रे बर्गर. जखमी/माघार घेतलेले खेळाडू: एडम झाम्पा, प्रसिद्ध कृष्णा.