RR vs DC Toss : दिल्लीने राजस्थान विरुद्ध टॉस जिंकला, प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 बदल

| Updated on: Mar 28, 2024 | 7:24 PM

IPL 2024 RR vs DC Toss Update : दिल्ली कॅपिट्ल्सच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. कॅप्टन ऋषभ पंत याने राजस्थान विरुद्धच्या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. पाहा दोन्ही संघांची प्लेईंग ईलेव्हन.

RR vs DC Toss : दिल्लीने राजस्थान विरुद्ध टॉस जिंकला, प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 बदल
Follow us on

आयपीएलच्या 17 व्या हंगामातील नवव्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने आहेत. हा सामना राजस्थानमधील जयपूर येथील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस पार पडला आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने टॉस जिंकला. कॅप्टन ऋषभ पंत याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्स आधी बॅटिंग करुन दिल्लीसमोर विजयी आव्हान ठेवणार आहे.

राजस्थानने दिल्ली विरुद्धच्या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल न करता आपल्या त्याच 11 खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. तर दिल्लीने मात्र एकूण 2 बदल केले आहेत. ईशांत शर्मा हा अद्याप बरा झालेला नाही. तर शाई होप याला पाठीत दुखापत आहे. त्यामुळे हो दोघे आजचा सामना खेळणार नाहीत. या दोघांच्या जागी एनरिच नॉर्तजे आणि मुकेश कुमार या दोघांचा प्लेईंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

आकडेवारी कुणाच्या बाजूने?

राजस्थान विरुद्ध दिल्ली दोन्ही संघ आयपीएलच्या इतिहासात एकूण 27 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये दोन्ही संघ जवळपास तुल्यबळ आहेत. मात्र राजस्थानने एक सामना जास्त जिंकला आहे. राजस्थानने 27 पैकी 14 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दिल्लीने 13 वेळा राजस्थानवर मात करत विजय नोंदवला आहे. तसेच राजस्थानने आपल्या होम ग्राउंड अर्थात सवाई मानसिंह स्टेडियमवर दिल्ली विरुद्ध एकूण 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर दिल्लीने 2 सामन्यात राजस्थानला घरच्या मैदानात पराभूत केलंय.

दोन्ही विकेटकीपर कॅप्टन सज्ज

दिल्ली कॅपिटल्स प्लेईंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर ), डेव्हीड वॉर्नर, मिचेल मार्श, रिकी भुई, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद आणि मुकेश कुमार.

राजस्थान रॉयल्स प्लेईंग इलेव्हन : संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा आणि आवेश खान.