RR vs MI : तिलक वर्मा-नेहल वढेरा जोडीची झुंजार भागीदारी, राजस्थानसमोर 180 धावांचं आव्हान

| Updated on: Apr 22, 2024 | 9:41 PM

IPL 2024 RR vs MI 1st Innings Highlights In Marathi : मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्ससमोर सातव्या विजयासाठी 180 धावांचं आव्हान दिलं आहे.

RR vs MI : तिलक वर्मा-नेहल वढेरा जोडीची झुंजार भागीदारी, राजस्थानसमोर 180 धावांचं आव्हान
nehal wadhera and tilak varma,
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

तिलक वर्मा आणि नेहल वढेरा या जोडीने केलेल्या 99 धावांच्या निर्णायक आणि चिवट भागीदारीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी 180 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबईने 9 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 179 धावा केल्या. मुंबईकडून तिलक वर्मा याने सर्वाधिक 65 धावांची खेळी केली. तर नेहल वढेरा याने 49 धावांचं योगदान दिलं. तर मोहम्मद नबीने 23 धावांचं योगदान दिलं. राजस्थानकडून संदीप शर्मा याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

मुंबईची बॅटिंग

टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलेल्या मुंबईची निराशाजनक सुरुवात झाली. रोहित 6, ईशान 0, सूर्यकुमार यादव 10 आणि मोहम्मद नबी 23 धावा करुन आऊट झाले. त्यामुळे मुंबईची स्थिती 4 बाद 52 धावा अशी झाली. मात्र त्यानंतर नेहल वढेरा आणि तिलक वर्मा या दोघांनी मुंबईचा डाव सावरला आणि टॉप गिअरमध्ये संधी मिळेल तशी फटकेबाजी केली.  या दरम्यान तिलक वर्मा याने अर्धशतक ठोकलं.  तर दुसऱ्या बाजूने नेहल वढेराही फटकेबाजी करुन अर्धशतकाच्या उंबरठ्यावर पोहचला. मात्र त्याचं अर्धशतक अवघ्या 1 धावेने हुकलं.  अशाप्रकारे नेहल आणि तिलक या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली.  नेहलने 24 बॉलमध्ये 3 फोर आणि 4 सिक्ससह 49 धावा केल्या. नेहल आऊट झाल्यानंतर मुंबईचा डाव गडगडला.

वढेरानंतर कॅप्टन हार्दिक पंड्या मैदानात आला. पंड्याने 10 बॉलमध्ये 1O धावा करुन आऊट झाला. पंड्यानंतर तिलक वर्मा माघारी परतला. तिलकने 45 बॉलमध्ये 5 चौकार आणि 3 सिक्सच्या मदतीने 65 धावांची खेळी केली. तर गेराल्ड कोएत्झी पहिल्याच बॉलवर आऊट झाला. तर टीम डेव्हिडने 5 बॉलमध्ये 3 धावांचं योगदान दिलं. पियूष चावला 1* आणि जसप्रीत बुमराह 2* धावा करुन नाबाद परतले. राजस्थानकडून संदीप व्यतिरिक्त ट्रेन्ट बोल्ट याने 2 विकेट्स घेतल्या. तर आवेश खान आणि युझवेंद्र चहल या दोघांना 1-1 विकेट मिळाली.

वर्मा-वढेराची निर्णायक खेळी

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा आणि युझवेंद्र चहल.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला आणि जसप्रीत बुमराह.