IPL 2024 : मुंबई इंडियन्ससोबत असलेली मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण? रोहित-बुमराह आणि पांड्यासोबत फोटो व्हायरल

| Updated on: Mar 29, 2024 | 1:43 PM

आयपीएल आणि मिस्ट्री गर्ल हे एक समीकरण जुळून आलं आहे. सामना सुरु असताना कॅमेरामन एखाद्या सुंदर मुलीकडे लक्ष वेधून घेतो आणि चर्चांना उधाण येतं. नेमकी आहे तरी कोण असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. असाच काही फोटो मुंबई इंडियन्स संघासोबत एका मिस्ट्री गर्लचे व्हायरल होत आहेत. चला जाणून घेऊयात याबाबत

IPL 2024 : मुंबई इंडियन्ससोबत असलेली मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण? रोहित-बुमराह आणि पांड्यासोबत फोटो व्हायरल
IPL 2024 : मुंबई इंडियन्ससोबत असलेल्या मिस्ट्री गर्लची सोशल मीडियावर रंगली जोरदार चर्चा, जाणून घ्या
Image Credit source: video grab
Follow us on

आयपीएल स्पर्धेतील 17 चं सुरुवातीचं पर्व मुंबई इंडियन्सला काही मानवलेलं नाही. सलग दोन पराभवामुळे टीकेची झोड उठली आहे. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने आणि दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने पराभवाची धूळ चारली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावरही अनेकांनी बोट ठेवलं आहे. कर्णधारपद भूषविताना केलेल्या चुकांचा पाढा गेल्या काही दिवसांपासून वाचला जात आहे. अशी सर्व मुंबई इंडियनच्या विपरीत परिस्थिती असताना मिस्ट्री गर्लची चर्चा रंगली आहे. मुंबई इंडियन्स संघासोबत मिस्ट्री गर्लचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अनेक जण सोशल मीडियावर तिची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबई इंडियन्सच्या दिग्गज क्रिकेटपटूंसोबत तिने फोटो काढले आहेत. यात रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांचाही समावेश आहे. चला जाणून घेऊयात मिस्ट्री गर्लबाबत

मिस्ट्री गर्लचं नाव सेजल जयस्वाल आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक रील पोस्ट केला आहे. मुंबई इंडियन्सच्या सर्व खेळाडूंसोबत तिने फ्लाईटमध्ये फोटो काढलेले यात दिसत आहेत. सेजल कधी रोहित शर्मासोबत, तर कधी गोलंदाज प्रशिक्षक लसिथ मलिंगासोबत दिसली. यात तिने टिम डेविड, पियुष चावला, तिलक वर्मासह मुंबईच्या खेळाडूंसोबत फोटो काढले आहेत. आता फॅन्स या पोस्टखाली आपआपल्या पद्धतीने कमेंट्स देत आहेत.

सेजल जयस्वाल एक अभिनेत्री असून यापूर्वी फिजिओथेरपिस्टही राहिली आहे. तिने दिल मांगे मोर आणि डेटिंग इन डार्क यासारख्या गाजलेल्या सीरियलमध्ये काम केलं आहे. वयाच्या 19 व्या वर्षापासून सेजल मॉडलिंग क्षेत्रात उतरली आहे. सेजल मुंबई इंडियन्सची फॅन असल्याचं फोटोतून अधोरेखित होत आहे.

मुंबई इंडियन्सला पुढचे चार सामना होमग्राउंड असलेल्या वानखेडेवर खेळायचे आहेत. सनरायझर्स हैदराबादकडून मिळालेल्या पराभवातून सावरण्यासाठी ही एक संधी आहे. 1 एप्रिल 2024 रोजी राजस्थान रॉयल्ससोबत वानखेडे स्टेडियममध्ये हा सामना होमार आहे. या सामन्यात विजय मिळाला तर मुंबईची पुढची वाट सोपी होईल. अन्यथा स्पर्धेत टिकून राहणं कठीण होईल.