IPL 2024 : धोनी आयपीएल स्पर्धा खेळणार की नाही? कोच फ्लेमिंग अनभिज्ञ, तर सीईओने केलं असं वक्तव्य

| Updated on: Mar 21, 2024 | 10:36 PM

आयपीएल स्पर्धेच्या एक दिवस आधीच महेंद्रसिंह धोनीच्या बातमीने खळबळ उडाली आहे. सामन्याआधीच महेंद्रसिंह धोनी कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. आता त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली आहे. कोच फ्लेमिंगलाही याबाबत तितकं माहिती नाही.

IPL 2024 : धोनी आयपीएल स्पर्धा खेळणार की नाही? कोच फ्लेमिंग अनभिज्ञ, तर सीईओने केलं असं वक्तव्य
धोनीने कर्णधारपद सोडताच खेळण्यावरही प्रश्नचिन्ह! कोच फ्लेमिंग बुचकळ्यात, तर सीईओने दिलं असं उत्तर
Follow us on

चेन्नई सुपर किंग्स फ्रेंचायसीने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात यशाची शिखरं गाठली आहेत. मागच्या 16 पर्वात पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स संघ म्हणजेच महेंद्रसिंह धोनी हे समीकरण पुढे येतं. धोनीच्या नेतृत्वाची चर्चा कायम होत असते. असं असताना स्पर्धेच्या एक दिवस आधी महेंद्रसिंह धोनी कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. तसेच संघाची धुरा ऋतुराज गायकवाड याच्या हाती सोपवली आहे. महेंद्रसिंह धोनीने 2022 मध्येही कर्णधारपद सोडलं होतं. तेव्हा नेतृत्व रवींद्र जडेजाच्या हाती सोपवलं होतं. पण संघाची स्थिती दयनीय झाली आणि पुन्हा एकदा नेतृत्व धोनीच्या हाती सोपवलं होतं. पण यावेळची स्थिती वेगळी असल्याचं सीएसके संघाचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी सांगितलं आहे. तर धोनी पूर्ण पर्वात खेळेल अशी शक्यता कोच फ्लेमिंग याने व्यक्त केली आहे. त्यामुळे या वक्तव्यांनी धोनीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली आहे.

कोट स्टीफन फ्लेमिंगने सांगितलं की, “संघाच्या भविष्यासाठी एमएस धोनीने घेतलेला निर्णय योग्य आहे. त्याच्यासाठी ही योग्य वेळ होती. आता ऋतुराज गायकवाडला तयार करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. जेव्हा धोनीने हा निर्णय घेतला तेव्हा संपूर्ण संघ स्तब्ध झाला होता. पण ऋतुराज गायकवाडला कर्णधार बनवताच सर्वांनी आनंद व्यक्त केला. मला आशा आहे की, धोनी संपूर्ण पर्वात खेळेल आणि चांगलं प्रदर्शन करेल. धोनीची शारीरिक स्थिती पूर्वीपेक्षा जबरदस्त आहे. त्याची खेळण्याची आणि चांगली कामगिरी करण्याची इच्छा यावेळेसही आहे.”

सीएसकेचे सीईओ एमएस धोनीबाबत सांगितलं की, “रवींद्र जडेजाला कर्णधार केलं होतं तेव्हा स्थिती काही वेगळी होती. तेव्हा केलेला बदल कामी आला नव्हता. पण यावेळेचा निर्णय वेगळा आहे. धोनीचे सर्व निर्णय संघाच्या हिताचे आहेत. मला त्याचा निर्णय कर्णधाराच्या बैठकीपूर्वी कळाला. यापूर्वी मला काहीही माहिती नव्हतं. धोनी असा निर्णय घेईल याची कल्पना नव्हती. मी त्याच्या निर्णयाचं स्वागत करतो. धोनी कायमच ऋतुराज गायकवाडला मार्गदर्शन करण्यास तयार असेल.”

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एमएस धोनी, मोईन अली, दीपक चहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सँटनेर, एन सिमरंत, एन. सिंधू, प्रशांत सोलंकी, महेश थेक्षाना, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रहमान, अवनीश राव अरवेल्ली. जखमी/माघार घेतलेले खेळाडू: डेव्हॉन कॉनवे, मथीशा पाथिराना.