IPL 2024 Orange Cap: ऑरेंज कॅपच्या शर्यतीत ऋषभ पंतची एन्ट्री, कितव्या स्थानावर जाणून घ्या

| Updated on: Apr 25, 2024 | 12:02 AM

IPL 2024 Orange Cap, Highest run scorer : ऑरेंज कॅपची शर्यत पुढच्या काही सामन्यात चुरशीची होणार आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात विरुद्धच्या सामन्यानंतर यात आणखी रंगत वाढली आहे. ऋषभ पंतने नाबाद 88 धावांची खेळी करत टॉप 5 मध्ये एन्ट्री घेतली आहे.

IPL 2024 Orange Cap: ऑरेंज कॅपच्या शर्यतीत ऋषभ पंतची एन्ट्री, कितव्या स्थानावर जाणून घ्या
Follow us on

आयपीएल स्पर्धेतील प्लेऑफची शर्यत रंगतदार वळणावर आली आहे. अजूनही कोणताच संघ प्लेऑफमध्ये क्वालिफाय होऊ शकलेला नाही. मात्र त्यासाठीची धडपड एकदम टोकाला गेल्याचं पाहायला मिळत आहे. प्रत्येक संघ पॉइंट आणि नेट रनरेटचं गणित सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात निराशाजनक राहिली होती. विजय मिळणं देखील कठीण झालं होतं. प्लेऑफच्या दिशेने कूच करेल की नाही याबाबतही शंका होती. मात्र दिल्ली कॅपिटल्सने जबरदस्त कमबॅक केलं आहे. गुजरातला 4 धावांनी पराभूत करत 8 गुणांसह सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून कर्णधार ऋषभ पंतने कॅप्टन इनिंग खेळली. ऋषभ पंतने चौथ्या स्थानावर फलंदाजी करत 43 चेंडूत 88 धावा केल्या. यात 5 चौकार आणि 8 षटकार मारले. या खेळीसह ऋषभ पंतने ऑरेंज कॅपच्या शर्यतीत एन्ट्री मारली आहे. दिल्ली कॅपिटल्सला आणखी 5 सामने खेळायचे असून ऋषभ पंतला अव्वल स्थानी येण्याची संधी आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा स्टार फलंदाज विराट कोहली ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. 8 सामन्यात विराट कोहलीने 379 धावा केल्या आहेत. दुसऱ्या स्थानावर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आहे. त्याने 8 सामन्यात 349 धावा केल्या आहेत. तिसऱ्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने झेप घेतली आहे. त्याने 9 सामन्यात 342 धावा केल्या. गुजरात टायटन्सचा साई सुदर्शनने चौथ्या स्थानी एन्ट्री मारली आहे. 334 धावांसह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. सनरायझर्स हैदराबादचा ट्रेव्हिस हेड पाचव्या स्थानी आहे. त्याने 324 धावा केल्या आहेत. सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात 41 वा सामना होणार आहे. या सामन्यात विराट कोहलीच्या डोक्यावर ऑरेंज कॅप राहते की ट्रेव्हिस हेड हिसकावून घेतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेलं.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा, संदीप वॉरियर.