IPL 2024 Orange Cap: ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सुनील नरीनची मोठी झेप, वाचा कोण कुठे?

| Updated on: Apr 26, 2024 | 11:23 PM

IPL 2024 Orange cap, Highest run scorer : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराट कोहलीचा पाठलाग करणं वाटतं तितकं सोपं राहिलं नाही. प्रत्येक सामन्यानंतर विराट कोहली मोठी झेप घेतो. त्यामुळे त्याला गाठणं कठीण झालं आहे. आता कोलकात्याचा सुनील नरीन या शर्यतीत आला आहे.

IPL 2024 Orange Cap: ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सुनील नरीनची मोठी झेप, वाचा कोण कुठे?
Follow us on

पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात कोलकात्याच्या सुनील नरीनने आक्रमक फलंदाजी केली. सुनील नरीनने 32 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 71 धावा केल्या. यासह त्याने ऑरेंज कॅपच्या शर्यतीत उडी घेतली आहे. थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. सुनील नरीनने 8 सामन्यात 1 शतक आणि दोन अर्धशतकांच्या जोरावर 357 धावा केल्या. विराट कोहली आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सुनील नरीन यांच्यात 73 धावांचं अंतर आहे. आयपीएल स्पर्धेत विराट कोहलीच्या डोक्यावरील ऑरेंज कॅप खेचून घेणं कठीण आहे. प्रत्येक सामन्यानंतर ऑरेंज कॅप शर्यतीतील अंतर वाढत आहे. त्यामुळे विराट कोहलीला गाठणं खूपच कठीण झालं आहे. विराट कोहलीच्या धावा करताना सातत्य पाहायला मिळत आहे. आतापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यांपैकी दोन सामन्यातच धावा झाल्या नाहीत. पण इतर सामन्यात त्याने साजेशी कामगिरी केली आहे. 1 शतक आणि तीन अर्धशतकांच्या जोरावर विराट कोहलीने 430 धावा केल्या आहेत.

विराट कोहलीच्या आसपास जाण्यासाठी टॉप 5 मधील फलंदाजांना एखाद शतक ठोकण्याची आवश्यकता आहे. अन्यथा विराट कोहली उर्वरित सामन्यात स्वस्तात बाद व्हावा यासाठी प्रार्थना करायला हवी. चेन्नई सुपर किंग्सचा ऋतुराज गायकवाड 349 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत 342 धावांसह चौथ्या, तर गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन 334 धावांसह पाचव्या स्थानावर आहे.

पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

पंजाब किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकात्याने फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 261 धावा केल्या आणि विजयासाठी 262 धावांचं आव्हान दिलं. पंजाब किंग्सने इतकं कठीण आव्हान 18.4 षटकात 2 गडी गमवून पूर्ण केलं. आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या चेस करण्याचा मान पंजाब किंग्सला मिळाला आहे. यास पंजाब किंग्सच्या पारड्यात दोन गुण पडले असून मुंबई इंडियन्सला मागे टाकत आठवं स्थान गाठलं आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, दुष्मंथा चमीरा, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन (कर्णधार), रिली रोसो, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग.