आयपीएलमध्ये 47 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने 7 गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन कोलकात्याने केलं. मात्र टॉप 5 मध्ये स्थान मिळवण्यात अपयश आलं. कोलकाता नाईट रायडर्सकडून वरुण चक्रवर्तीने 4 षटाकत 16 धावा देत 3 गडी बाद केले. वैभव अरोरा आणि हार्षित राणा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. तर मिचेल स्टार्क हा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने 3 षटकात 43 धावा देत 1 गडी बाद केला. यात त्याने 6 वाईड चेंडू टाकले. या व्यतिरिक्त सुनील नरीनने 1 गडी बाद केला. दिल्ली कॅपिटल्सकडून अक्षर पटेल आणि लिझाद विल्यम वगळता एकाही गोलंदाजाला विकेट घेता आली नाही. अक्षऱ पटेलने 2 गडी बाद केले. तर लिझाद विल्यम्सने एक गडी बाद केला. पर्पल कॅपची शर्यत पाहता गोलंदाजांमध्ये फक्त एक दोन विकेट्स किंवा इकोनॉमी रेटचा फरक आहे. या व्यतिरिक्त खऱ्या अर्थाने 20 खेळाडू पर्पल कॅपच्या शर्यतीत आहेत असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही.
मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने 9 सामन्यात 14 गडी बाद केले. त्याने एकूण 36 षटकं टाकली असून 239 धावा दिल्या. त्याचा इकोनॉमी रेट हा 6.63 इतका होता. दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्सचा मुस्तफिझुर रहमान आहे. त्याने 8 सामन्यात 14 गडी बाद केले. त्याने 30.2 षटकं टाकली आणि 296 धावा दिल्या. त्याचा इकोनॉमी रेट हा 9.75 इतका आहे. तिसऱ्या स्थानावर पंजाब किंग्सचा हर्षल पटेल आहे. त्यानेही 32 षटकं टाकत 326 धावा देत 14 गडी बाद केले. त्याचा इकोनॉमी रेट हा 10.18 इतका आहे. चौथ्या क्रमांकावर चेन्नईचा मथीशा पथिराना आहे. त्याने 13 गडी बाद केले आहेत. तर पाचव्या स्थानावर सनरायझर्स हैदराबादचा टी नटराजन असून त्यानेही 13 गडी बाद केले आहेत. मात्र पथिरानाच्या तुलनेत इकोनॉमी रेट जास्त आहे.
कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रसिक दार सलाम, लिझाद विल्यम्स, खलील अहमद.