IPL 2024 Purple Cap: गुजरात दिल्ली सामन्यानंतर पर्पल कॅपचा मान कोणाला? जाणून घ्या

| Updated on: Apr 25, 2024 | 12:03 AM

IPL 2024 Purple Cap, Most wicket taker : दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्स विरुद्धचा सामना 4 धावांनी जिंकला. मात्र या सामन्यात प्रत्येक चेंडूनंतर रंगत वाढत होती. गोलंदाजाला षटकार पडला की सामना गुजरातकडे आणि विकेट पडली तर सामना दिल्लीच्या पारड्यात झुकायचा.

IPL 2024 Purple Cap: गुजरात दिल्ली सामन्यानंतर पर्पल कॅपचा मान कोणाला? जाणून घ्या
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेतील दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना धडधड वाढवणारा होता. प्रत्येक चेंडूनंतर सामन्याची रंगत वाढत होती. कधी सामना इथे तर कधी तिथे झुकत होता. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 224 धावा केल्या आणि विजयासाठी 225 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र गुजरात टायटन्सचा संघ 220 धावा करू शकला. या सामन्यात दिल्लीने गुजरातला 4 धावांनी मात दिली. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून रसिख दार सलाम आणि कुलदीप यादव यांनी चांगला स्पेल टाकला. कुलदीप यादवने 4 षटकात 29 धावा देत 2 गडी बाद केले. कुलदीपच्या या कामगिरीमुळे टॉप 5 मध्ये एन्ट्री मारली आहे. रसिख दार सलामने 4 षटकात 44 धावा देत 3 गडी बाद केले.

मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमराह याच्या डोक्यावर पर्पल कॅप कायम आहे.  8 सामन्यात 13 विकेट्स घेत अव्वल स्थान गाठलं. 32 षटकात इकोनॉमी रेट 6.37 इतका आहे.  दुसऱ्या क्रमांकावर 13 विकेटसह राजस्थान रॉयल्सचा युझवेंद्र चहल आहे. त्याचा इकोनॉमी रेट बुमराहच्या तुलनेत जास्त आहे. त्याने 30 षटकात 8.83 च्या इकोनॉमी रेटने धावा दिल्या आहेत. तिसऱ्या स्थानावर 13 विकेटसह पंजाब किंग्सचा हर्षल पटेल आह. त्याने 29 षटकात 9.58 च्या इकोनॉमीने गोलंदाजी केली आहे. चौथ्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्सच्या कुलदीप यादवने एन्ट्री घेतली आहे. त्याने 6 सामन्यात 12 गडी बाद केले आहेत. 24 षटकात त्याचा इकोनॉमी रेट हा 7.62 हा आहे.

पाचव्या स्थानावर चेन्नई सुपर किंग्सच्या मुस्तफिझुर रहमानने असून 12 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा  इकोनॉमी रेट हा 10.07 इतका आहे. सहाव्या स्थानावर मुंबई इंडियन्सचा गेराल्ड कोएत्झी असून त्याने 12 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा इकोनॉमी रेट 10.10 इतका आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा, संदीप वॉरियर.