IPL 2024 Purple Cap: हर्षल पटेलला पुन्हा एकदा पर्पल कॅपचा मान, कोण कुठे ते जाणून घ्या

| Updated on: Apr 26, 2024 | 11:34 PM

IPL 2024 Purple Cap, Most wicket taker : आयपीएल 2024 स्पर्धेतील 42वा सामना पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगला. या सामन्यात हर्षल पटेलने एक गडी बाद केला आणि जसप्रीत बुमराहला मागे टाकलं आहे. चला जाणून घेऊयात कोण कोणत्या स्थानी ते

IPL 2024 Purple Cap: हर्षल पटेलला पुन्हा एकदा पर्पल कॅपचा मान, कोण कुठे ते जाणून घ्या
Follow us on

ऑरेंज कॅपची शर्यत गेल्या काही दिवसांपासून एकतर्फी सुरु आहे. दुसरीकडे, पर्पल कॅपच्या शर्यतीत मात्र वरखाली होताना दिसत आहे. कधी कॅप या गोलंदाजाच्या डोक्यावर, तर कधी दुसऱ्याच्या..प्रत्येक सामन्यानंतर काही ना काही बदल होताना दिसत आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात हर्षल पटेले फक्त 1 गडी बाद केला आणि थेट तिसऱ्या स्थानावरून अव्वल स्थानी झेप घेतली आहे. हर्षल पटेलने 3 षटकात 48 धावा देत 1 गडी बाद केला. यासह त्याच्या नावावर सर्वाधिक विकेट्स झाले आहेत. हर्षल पटेलने आतापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यात 32 षटकं टाकली. यात त्याने एकूण 326 धावा दिल्या आणि 14 गडी बाद केले. त्याचा इकोनॉमी रेट हा 10.18 इतका आहे. दुसऱ्या क्रमाकांवर मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमराह आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात एक विकेट घेताच हा मान पुन्हा त्याला मिळणार आहे.

जसप्रीत बुमराहने 8 सामन्यात 32 षटकं टाकली आणि 204 धावा दिल्या. बुमराहने 13 विकेट घेतल्या असून इकोनॉमी रेटच हा 6.37 आहे. तिसऱ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्सचा युझवेंद्र चहल आहे. त्याने 8 सामन्यात 30 षटकं टाकतं 13 गडी बाद केले आहेत. चहलचा इकोनॉमी रेट हा 8.83 इतका आहे. चौथ्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्सचा कुलदीप यादव आहे. त्याने फक्त 6 सामने खेळत 12 गडी बाद केले आहेत. त्याचा इकोनॉमी रेट हा 7.62 इतका आहे. पाचव्या क्रमांकावर सनरायझर्स हैदराबादचा टी नजराजन आहे. त्याने 6 सामन्यात 8.70 च्या इकोनॉमी रेटने 12 गडी बाद केले आहेत.

कोलकाता नाईट रायडर्सला पंजाब किंग्सने दणका दिला आहे. ईडन गार्डवर पंजाब किंग्सने सर्वात मोठी धावसंख्यागाठली आहे. कोलकात्याने विजयासाठी 262 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान पंजाब किंग्सने 2 गडी गमवून 18.4 षटकात पूर्ण केलं. या विजयासह पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला मागे टाकत आठवं स्थान गाठलं आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, दुष्मंथा चमीरा, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन (कर्णधार), रिली रोसो, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग.