BCCI : महिला खेळाडूंसाठी खुशखबर, आयपीएलमध्ये ‘हा’ बदल

| Updated on: Sep 22, 2022 | 6:11 PM

महत्त्वाच्या मुद्द्यांवर सर्व राज्य संघटनांना पत्र लिहिलंय की बीसीसीआय महिला आयपीएलवर काम करत आहे. त्यामुळे आता महिला आयपीएल होणार इतक मात्र नक्की असल्याचं बोललं जातंय. याविषयी वाचा...

BCCI : महिला खेळाडूंसाठी खुशखबर, आयपीएलमध्ये हा बदल
sourav ganguly
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली : महिला क्रिकेटपटूंसाठी एक खुशखबर आहे. ही मोठी बातमी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी दिली आहे. बीसीसीआय (BCCI) पुढील वर्षाच्या सुरुवातीला महिला आयपीएल (IPL) सुरू करणार आहे. गांगुलींनी माहिती देताना सांगितलंय की, महत्त्वाच्या मुद्द्यांवर सर्व राज्य संघटनांना पत्र लिहिलंय की बीसीसीआय महिला आयपीएलवर काम करत आहे. त्यामुळे आता महिला आयपीएल होणार इतक मात्र नक्की असल्याचं बोललं जातंय.

होम अँड अवे फॉरमॅट

पुढील वर्षीपासून पुरुषांची आयपीएल होम अँड अवे फॉरमॅटमध्ये येणार आहे. 10 संघांना त्यांचं होम ग्राउंड म्हणून नियुक्त स्टेडियम मिळेल, असंही बीसीसीआयनं म्हटलंय. बीसीसीआनं सर्व राज्य क्रिकेट संघटनांना ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता ही एक चांगली बाब असल्याचं बोललं जातंय.

ठरावीक ठिकाणीच आयोजन

2020 मध्ये कोरोनापासून आयपीएल फक्त काही ठिकाणी आयोजित करण्यात आलीय. 2020 आणि 2021 मध्ये, दुबई, शारजाह आणि अबू धाबी या तीन युएई मैदानांवर दुसरा हाफ आयोजित करण्यात आलीय. 2021 IPL च्या पहिल्या सहामाहीचे सामने दिल्ली, अहमदाबाद, मुंबई आणि चेन्नई येथे खेळले गेले.

BCCI 2020 नंतर प्रथमच संपूर्ण देशांतर्गत हंगाम आयोजित करतंय. भारतीय पुरुष संघ ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि न्यूझीलंड, तर महिला संघ ऑस्ट्रेलियाचे यजमानपद भूषवणार असल्याचंही पत्रात नमूद करण्यात आलंय.

महिला आयपीएलविषयी…

महिलांच्या IPLसह BCCI मुलींच्या U-15 ODI टूर्नामेंट देखील आणणार आहे. या सीझनपासून 15 वर्षांखालील मुलींची एकदिवसीय स्पर्धा सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे, असं बीसीसीआयनं पत्रात म्हटलंय.

आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरीची संधी

या नवीन स्पर्धेमुळे आमच्या तरुण मुलींना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा मार्ग मोकळा होईल. 15 वर्षांखालील महिलांची पहिली स्पर्धा 26 डिसेंबर ते 12 जानेवारी दरम्यान बेंगळुरू, रांची, राजकोट, इंदूर, रायपूर, पुणे या पाच ठिकाणी खेळवली जाईल, असंही पत्रात नमुद करण्यात आलंय.