सलग 4 चेंडूत 6, 4, 4, 4…. हरमनप्रीत कौरचं शतक, इंग्लंडला धू धू धुतलं

हरमनप्रीतनं इंग्लंडविरुद्ध धमाकेदार खेळी करताना विक्रमी शतक झळकावलं. हरमनप्रीतनं नाबाद 143 धावा करत विक्रम केलाच. टीम इंडियानं इंग्लंडविरुद्धची सर्वात मोठी धावसंख्याही केली. यातून हरमनप्रीतची दमदार कामगिरी दिसून आली. 

सलग 4 चेंडूत 6, 4, 4, 4.... हरमनप्रीत कौरचं शतक, इंग्लंडला धू धू धुतलं
हरमनप्रीतची इंग्लंडविरुद्ध धमाकेदार खेळीImage Credit source: social
Follow us
| Updated on: Sep 21, 2022 | 10:36 PM

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट टीमनं (Womens Cricket Team) इंग्लंडविरुद्ध (England) खेळताना आणखी एक दमदार कामगिरी केली आहे. हरमनप्रीतनं (Harmanpreet Kaur) वनडे सीरिजमध्ये धमाकेदार कामगिरी करत शतक जळकावलं आहे. हे शतक झळकावनं देखील शक्य नव्हतं पण तिनं केलेली कामगिरी धडाकेबाजच होती. आधी भारताच्या महिला क्रिकेट संघानं पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान इंग्लंडला सहज पराभूत केल्यानंतर टीम इंडियानं दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पुन्हा एकदा इंग्लंडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला आहे. यात संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरची महत्वाची भूमिका होती.

सलग 4 चेंडूत 6, 4, 4, 4

शतक पूर्ण करताच हरमनप्रीतनं शेवटच्या 3 षटकात 11 चेंडू खेळले आणि त्यात एकटीनं 43 धावा केल्या. यात शेवटच्या षटकात सलग 4 चेंडूत 6, 4, 4, 4 अशी चौकारही ठोकले.

सर्वात मोठी धावसंख्या

हरमनप्रीतनं इंग्लंडविरुद्ध धमाकेदार खेळी करताना विक्रमी शतक झळकावलं. हरमनप्रीतनं नाबाद 143 धावा करत विक्रम केलाच. पण, टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची सर्वात मोठी धावसंख्याही केली.

आज कॅंटरबरीमध्ये झालेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरनं इंग्लंडच्या गोलंदाजांचा मारा करताना नाबाद 143 धावांची जबरदस्त धावसंख्या उभारली. हरमनप्रीतच्या खेळीनं टीम इंडियाला 50 षटकांत 5 विकेट गमावून 333 धावांपर्यंत मजल मारली.

पाचवे शतक

हरमनप्रीतनं विश्वचषकात मिळवलेली गती कायम ठेवली आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हरमनप्रीतनं आपल्या ओळखीच्या शैलीत मोठे फटके मारून इंग्लंडला पूर्णपणे अडचणीत आणलं. हे विशेष

डावाच्या 47व्या हरमनप्रीतनं षटकात आपलं शतक पूर्ण केलं. तिनं 100 चेंडूत आपल्या वनडे कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावलंय. कर्णधार म्हणून हे दुसरे एकदिवसीय शतक आहे. मात्र, पूर्ण कर्णधार झाल्यानंतर तिनं प्रथमच शतक ठोकलंय.

ऑन-साइडवर चेंडू सीमापार नेण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या हरमनप्रतीनं या डावात ऑफ-साइडमध्येही अनेक स्फोटक शॉट्स केले. शतक पूर्ण करताच हरमनप्रीतनं शेवटच्या 3 षटकात 11 चेंडू खेळले आणि त्यात एकटीनं 43 धावा केल्या. यात शेवटच्या षटकात सलग 4 चेंडूत 6, 4, 4, 4 अशी चौकारही ठोकले.

Non Stop LIVE Update
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.