स्मृती मंधानाचा नवा रेकॉर्ड, शिखर धवनसारखं केलं काम

महिला क्रिकेटर स्मृती मंधानानं एक मोठी कामगिरी केली आहे. तिनं आपल्या दमदार खेळीच्या जोरावर पुन्हा एक नवा विक्रम केला आहे. मंधानाचा नवा विक्रम कोणता, ते जाणून घ्या..

Sep 21, 2022 | 9:12 PM
शुभम कुलकर्णी

|

Sep 21, 2022 | 9:12 PM

एकीकडे ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा तीन टी-20 सीरिजमधील पहिल्या सामन्यात दारुण पराभव झाला तर दुसरीकडे एक चांगली बातमी क्रिकेटविश्वातून समोर येत आहे. ही बातमी महिला क्रिकेटर स्मृती मंधानासंदर्भात आहे.

1 / 5
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधानानं दमदार कामगिरी नेहमीच केली आहे. तिनं आता एक विक्रमही आपल्या नावावर केलाय. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शानदार खेळी केल्यानंतर स्मृतीनं दुसऱ्या वनडेतही संघाला चांगली सुरुवात करून दिली. याचवेळी तिनं एक खास विक्रमही आपल्या नावावर नोंदवलाय.

2 / 5
कॅंटरबरीमध्ये इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजी करताना तिनं 40 धावा केल्या. यावेळी  एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिनं 3 हजार धावा पूर्ण केल्या. 3 हजार धावा पूर्ण करणारी मंधाना भारताची तिसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

3 / 5
मंधानापूर्वी मिताली राज आणि हरमनप्रीत कौर यांनी भारतासाठी 3 हजार धावा केल्या आहेत. मंधाना सर्वात वेगवान भारतीय फलंदाज ठरली आहे. अवघ्या 76 डावात तिनं ही कामगिरी केली.

4 / 5
एवढंच नाही तर महिला क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 3 हजार धावा करणारी स्मृती मंधा तिसरी फलंदाज ठरली. फलंदाजीत मंधाना पुरुष क्रिकेटपेक्षाही पुढे राहिली आहे. यात टीम इंडियामध्ये शिखर धवन आणि विराट कोहलीचा नंबर लागतो.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें