सामन्यापूर्वी शारीरिक संबंध ठेवा, भारतीय क्रिकेटपटूंना कोचने दिला होता सल्ला, खळबळजनक प्रसंग समोर!

| Updated on: Aug 11, 2021 | 5:41 PM

मैदानावर प्रतिस्पर्ध्यांना हरविण्यासाठी, सामना जिंकण्यासाठी सराव केला जातो, रणनिती आखण्यात येते. पण टीम इंडियाच्या एका प्रशिक्षकांनी मॅचपूर्वी खेळाडूंना शारीरिक संबंध ठेवण्याचा सल्ला दिला होता. (Love before the match, Indian cricketers were advised by the coach paddy Apton)

सामन्यापूर्वी शारीरिक संबंध ठेवा, भारतीय क्रिकेटपटूंना कोचने दिला होता सल्ला, खळबळजनक प्रसंग समोर!
कोच पॅडी अप्टन यांच्या पुस्तकात खळबळजनक खुलासा- मॅचपूर्वी टीम इंडिया खेळाडूंना सेक्स करण्याचा सल्ला
Follow us on

मुंबई : मैदानावर प्रतिस्पर्ध्यांना हरविण्यासाठी, सामना जिंकण्यासाठी सराव केला जातो, रणनिती आखण्यात येते. पण टीम इंडियाच्या (Team India) एका प्रशिक्षकांनी मॅचपूर्वी खेळाडूंना शारीरिक संबंध ठेवण्याचा सल्ला दिला होता. या मोठ्या आणि खळबळजनक प्रसंगाचा खुलासा खुद्द कोचनेच केला आहे. टीम इंडियाचे माजी मेंटल आणि कंडिशनिंग प्रशिक्षक पॅडी अप्टन (Paddy Apton) यांनी आपल्या ‘द बेअरफूट कोच’ (The Bearfoot Coach) या पुस्तकात भारतीय खेळाडूंना सामन्यापूर्वी लैंगिक संबंध ठेवण्यास सांगितले होते, असं लिहिलं आहे. (Love before the match, Indian cricketers were advised by the coach Paddy Apton)

पॅडी अप्टन यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे की, “टीम इंडियाच्या खेळाडूंना लैंगिक संबंध ठेवण्याच्या सल्ल्याने तत्कालीन मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन चिडले होते”, तथापि, नंतर अप्टन यांनी त्यांच्या सल्ल्याबद्दल दिलगिरीही व्यक्त केली होती. गॅरी कर्स्टन यांच्या प्रशिक्षणाखाली भारताने 2011 मध्ये श्रीलंकेला नमवून तब्बल 28 वर्षानंतर एकदिवसीय विश्वचषक जिंकला.

अप्टन यांच्या सल्ल्यावर कर्स्टन भडकले होते

भारतीय खेळाडूंना सेक्ससंबंधात जे काही सांगितलं होतं ती केवळ एक सूचना होती. एका विषयावर बोलताना मी हा सल्ला दिला होता, असं अप्टनने यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे. पण त्यावेळी जेव्हा गॅरी कर्स्टन यांना ही गोष्ट समजली तेव्हा ते रागाने लालबुंद झाले होते.

वास्तविक, नंतर बऱ्याच काळाने पॅडी अप्टनला देखील आपली चूक लक्षात आली. मी त्यावेळी असं बोलायला नको होतं, अशी कबुली त्यांनी नंतरच्या काळात दिली. टीम इंडियाचे माजी माजी मेंटल आणि कंडिशनिंग प्रशिक्षक व्यतिरिक्त, अप्टन राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षकही होते.

तो सल्ला माझी चूक होती

अप्टन यांनी पुस्तकात राहुल द्रविड, गौतम गंभीर यांच्यासारख्या खेळाडूंची नावे लिहिली आहेत. त्यांनी पुस्तकात लिहिले की तेव्हा टीम इंडिया 2009 च्या तयारीत व्यस्त होती. त्याचबरोबर, खेळाडूंसाठीच्या नोट्स तयार करताना त्यांनी लैंगिक संबंधाची माहितीही दिली होती. अप्टनने पुस्तकाच्या ‘इगो अँड ग्रेटेस्ट प्रोफेशनल एरर’ मधील प्रकरणात त्यांच्या त्यावेळच्या प्रसंगाचा संदर्भ दिला आहे.

(Love before the match, Indian cricketers were advised by the coach paddy Apton)

हे ही वाचा :

रोहित शर्माने 5 कोटींना विकलं घर, पण अशी काय गरज पडली, अन् कुणाला विकलं घर?

WTC Final : केन आणि विराटचा मिठी मारतानाच्या फोटोवर केनचा खुलासा, सांगितले विराटला मिठी मारण्याचे कारण