AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित शर्माने 5 कोटींना विकलं घर, पण अशी काय गरज पडली, अन् कुणाला विकलं घर?

सध्या भारतीय संघासोबत इंग्लंडत्या दौऱ्यावर असणारा क्रिकेटपटू रोहित शर्माने आपलं घर विकलं आहे. शर्माने 5 कोटींहून अधिक किंमतीला घर विकले आहे.

रोहित शर्माने 5 कोटींना विकलं घर, पण अशी काय गरज पडली, अन् कुणाला विकलं घर?
Rohit and ritika
| Edited By: | Updated on: Jul 01, 2021 | 1:59 PM
Share

मुंबई : भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या संपूर्ण संघासोबत इंग्लंडच्या दौऱ्यावर (England Tour) आहे.  त्याची फॅमिली देखील त्याच्योसोबत असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर (WTC) इंग्लंड विरुद्धच्या कसोची मालिकेपूर्वी सुट्टीमध्ये रोहित फॅमिलीसोबत वेळ घालवत आहे. याच सुट्टीचा सदुपयोग करत रोहितने महाराष्ट्रातील लोणावळा येथे असलेले त्याचे घर विकले आहे. तब्बल 6 हजार 259 स्क्वेयर फीटचे घर रोहितने 5 कोटी 25 लाखांना विकले आहे. 29 मे 2021 रोजी घराची डील फायनल झाल्याची माहितीही समोर आली आहे. (Indian Cricketer Rohit Sharma Sells His Lonavala House To 5.25 crores)

रोहितचे हे लोणावळा येथील घर सुषमा अशोक सर्राफ नावाच्या एका व्यक्तीने घेतले आहे. दरम्यान अनेक क्रिकेटपटू गुतंवणूक म्हणून अशा प्रकारे घरांची खरेदी विक्री करत असतात. क्रिकेटपटू एखाद्या जागी घर घेतल्यानंतर त्याठिकाणी काही काळ फॅमिलीसोबत वेळ घालवतात. दरम्यान रोहितने नेमके कोणत्या कारणासाठी घर विकले आहे हे समोर आलेले नाही. मात्र Moneycontrol.com यांनी रोहितने गुंतवणूक म्हणून घेतलेल घर विकल्याची माहिती दिली आहे.

14 जुलैला पुन्हा एकत्र येणार भारतीय संघ

WTC final मध्ये पराभवाची निराशा दूर करण्यासाठी सर्व संघ आपल्या आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवत आहे. रोहितही फॅमिलीसोबत सुट्टी एन्जॉय करत आहे. दरम्यान ही सुट्टी संपवून 14 जुलैला सर्व संघाला एकत्र लंडनमध्ये जमाव लागणार आहे. तेथून इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका खेळण्यासाठी सर्व संघ नॉटिंघमला रवाना होईल. इंग्लंड विरुद्धची 5 कसोटी सामन्यांची सिरीज ही 4 ऑगस्टपासून सुरु होणार आहे.

हे ही वाचा –

अवघ्या 16 व्या वर्षी शेवटचा कसोटी सामना, मग कितव्या वर्षी आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्ये केलं पदार्पण?

ICC Test Rankings : न्यूझीलंड संघासह खेळाडूंची गरुडझेप, टॉप 10 मध्ये तीन भारतीय, ‘हा’ फलंदाज पहिल्या स्थानावर

ICC Cricket T20 World Cup 2021 Schedule : टी 20 वर्ल्ड कपच्या तारखा जाहीर, फायनल कधी?

(Indian Cricketer Rohit Sharma Sells His Lonavala House To 5.25 crores)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...