Team India : मुंबई इंडियन्सच्या ‘या’ दोन प्लेयर्सना T20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात स्थान मिळणं कठीण

| Updated on: Apr 18, 2024 | 7:50 AM

Team India : T20 वर्ल्ड कप 2 जूनपासून अमेरिकेत सुरु होणार आहे. या टुर्नामेंटसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होऊ शकते. यात महत्त्वाच हे आहे की, टीम मॅनेजमेंटने 20 संभाव्य खेळाडूंची यादी तयार केलीय. या यादीत किती ऑलराऊंडर्स, किती विकेटकीपर, किती फलंदाज आणि किती गोलंदाज आहेत, ते जाणून घ्या.

Team India : मुंबई इंडियन्सच्या या दोन प्लेयर्सना T20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात स्थान मिळणं कठीण
team india rohit sharma
Image Credit source: K L Rahul X Account
Follow us on

IPL 2024 चा सीजन सुरु असताना टीम इंडियाच्या सिलेक्शनची चर्चा सुरु झाली आहे. 2 जूनपासून T20 वर्ल्ड कप होणार आहे. त्यासाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होऊ शकते. मोठी बातमी ही आहे की, टीम मॅनेजमेंटने 20 संभाव्य खेळाडूंची यादी तयार केलीय. यात इशान किशन, तिलक वर्मा सारख्या खेळाडूंच नाव नाहीय. पीटीआयच्या रिपोर्ट्नुसार टीम इंडिया लवकरच 15 खेळाडूंच्या स्क्वाडची घोषणा करेल. 5 खेळाडू स्टँडबाय म्हणून टीम सोबत जातील.

रिपोर्ट्सनुसार, टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कपच्या स्क्वाडमध्ये एकूण 6 स्पेशलिस्ट फलंदाजांची निवड करेल. यात कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंह ही नाव आहेत.

संधी मिळू शकते असे 4 ऑलराऊंडर्स कोण?

रिपोर्ट्नुसार, टीम इंडिया टी20 स्क्वाडमध्ये 4 ऑलराऊंडर्सना संधी देऊ शकते. यात रवींद्र जाडेजा पहिलं नाव आहे. त्याशिवाय अक्षर पटेल सुद्धा या शर्यतीत आहे. हार्दिक पांड्याला सुद्धा T20 वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळणं निश्चित मानलं जातय. महत्त्वाच म्हणजे शिवम दुबे सुद्धा या शर्यतीत आलाय.

निवड होऊ शकते असे 3 विकेटकीपर कोण?

टीम इंडिया टी20 वर्ल्ड कपसाठी तीन विकेटकीपरची निवड करेल. यात खास नाव ऋषभ पंतच आहे. रस्ते अपघातामुळे पंत दीड वर्ष क्रिकेटच्या मैदानापासून लांब होता. पण आता त्याने पुनरागमन केलय. आयपीएलमध्ये तो दमदार खेळ दाखवतोय. त्याची निवड निश्चित मानली जात आहे. त्याशिवाय संजू सॅमसन, केएल राहुल विकेटकीपर म्हणून टीममध्ये असू शकतात. इशान किशनला विकेटकीपरच्या शर्यतीतून आऊट मानलं जात आहे.

गोलंदाज कोण असतील?

टी20 वर्ल्ड कप स्क्वाडमध्ये तीन स्पेशलिस्ट स्पिनर असतील. यात कुलदीप यादव पहिलं नाव आहे. या शर्यतीत युजवेंद्र चहल आणि रवी बिश्नोई सुद्धा आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज यांचं सिलेक्शन पक्कं आहे. अर्शदीप सिंह शिवाय आवेश खानची सुद्धा टीम इंडियात T20 वर्ल्ड कपसाठी निवड होऊ शकते.