IPL 2024 : केएल राहुलला आयपीएल खेळण्यास हिरवा कंदील, पण…

| Updated on: Mar 18, 2024 | 8:41 PM

आयपीएल 2024 स्पर्धा सुरु होण्यापूर्वी लखनौ सुपर जायंटच्या गोटात आनंदाचं वातावरण पसरलं आहे. कारण केएल राहुल संघात परतला आहे. एनसीएने केएल राहुलला आयपीएल 2024 स्पर्धेत खेळण्यास परवानगी दिली आहे. पण असं असलं तरी समोर एक अट ठेवली आहे.

IPL 2024 : केएल राहुलला आयपीएल खेळण्यास हिरवा कंदील, पण...
IPL 2024 : केएल राहुल आयपीएल स्पर्धेत करणार फटकेबाजी, असं असलं तरी...
Follow us on

मुंबई : आयपीएल स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. सर्वच संघांनी जेतेपदासाठी जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान केएल राहुल जखमी असल्याने लखनौ सुपर जायंट्सच्या गोटात चिंतेचं वातावरण पसरलं होतं. एनसीए परवानगी देणार की नाही इथपासून सर्व सुरुवात होती. अखेर एनसीएने केएल राहुलला आयपीएलच्या 17 व्या पर्वात खेळण्यास परवानगी दिली आहे. मागच्या पर्वात जखमी झाल्याने केएल राहुलला अर्ध्यातच स्पर्धा सोडावी लागली होती. त्यानंतर वनडे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी कमबॅक केलं होतं. मात्र इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर त्याच्या उपचार करण्यात आले होते. तसेच एनसीएमध्ये फलंदाजी, विकेटकीपिंग करण्यासोबत क्षेत्ररक्षण करताना दिसला होता. त्या संदर्भातला एक व्हिडीओ पोस्ट केला होता. आता तो आयपीएल स्पर्धेत पुनरागमन करण्यास सज्ज आहे.पण एनसीए एक अट समोर ठेवली आहे.

एनसीएने सुरुवातीच्या सामन्यात जास्तीचा कार्यभार घेण्यास मनाई केली आहे. म्हणजेच केएल राहुल सुरुवातीच्या काही सामन्यात विकेटकीपिंग करताना दिसणार नाही. त्यामुळे सुरुवातीच्या काही सामन्यात केएल राहुल फक्त फलंदाज म्हणून आपली भूमिका बजावेल. तसं पाहिलं तर लखनौ सुपर जायंट्स संघात विकेटकीपिंगचा काही इश्यू नाही. संघात दोन तगडे विकेटकीपर आहेत. यात दक्षिण अफ्रिकेचा क्विंटन डिकॉक आणि वेस्ट इंडिजचा निकोलस पूरन यांचा समावेश आहे.

केएल राहुल 20 मार्चपासून लखनौ सुपर जायंट्स संघासोबत असणार आहे. लखनौ संघाचा पहिला सामना 24 मार्चला राजस्थान रॉयल्स विरुद्ध असणार आहे. मागच्या पर्वात लखनौ सुपर जायंट्सने चांगली कामगिरी केली होती. तसेच गुणतालिकेत तिसरं स्थान पटकावलं होतं. 14 पैकी 8 सामन्यात विजय मिळवून 17 गुणांसह तिसरं स्थान गाठलं होतं.

लखनौ सुपर जायंट्स: केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, आयुष बडोनी, काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, देवदत्त पडिककल, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, कृणाल पंड्या, युद्धवीर सिंग, प्रेरक मंकड, यश ठाकूर, अमित मिश्रा, शामर जोसेफ, मयंक यादव, मोहसीन खान, के. गौथम, शिवम मावी, अर्शीन कुलकर्णी, एम. सिद्धार्थ, ॲश्टन टर्नर, डेव्हिड विली, मोहम्मद. अर्शद खान.