NZW vs SAW : दक्षिण आफ्रिकेने एकाच खेळाडूसमोर गुडघे टेकले, न्यूझीलंडचा 92 धावांनी विजय

New Zealand vs South Africa Women 5th T20i : न्यूझीलंडची कॅप्टन अमेलिया केर हीने केलेल्या शतकी खेळीसमोर दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ ढेर झाला. न्यूझीलंडने अशाप्रकारे हा सामना एकतर्फी फरकाने आपल्या नावावर केला.

NZW vs SAW : दक्षिण आफ्रिकेने एकाच खेळाडूसमोर गुडघे टेकले, न्यूझीलंडचा 92 धावांनी विजय
New Zealand Amelia Kerr
Image Credit source: AP
| Updated on: Mar 26, 2026 | 5:55 AM

न्यूझीलंड मेन्स क्रिकेट टीमला मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20i मालिका गमवावी लागली. दक्षिण आफ्रिकेने पाचव्या आणि निर्णायक सामन्यात न्यूझीलंडवर 33 धावांनी विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह 5 सामन्यांची मालिका 3-2 अशा फरकाने आपल्या नावावर केली. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडच्याच वुमन्स टीमसमोर संपूर्ण दक्षिण आफ्रिकेने गुडघे टेकले. न्यूझीलंडने कॅप्टन अमेलिया केर हीने केलेल्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेवर पाचव्या आणि अंतिम टी 20i सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. न्यूझीलंड वुमन्स क्रिकेट टीमने अशाप्रकारे ही मालिका 4-1 अशा फरकाने नावावर केली. अमेलिया केर न्यूझीलंडच्या विजयाची नायिका ठरली.

अमेलिया केरची फायर खेळी

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका बुधवारी 25 मार्च रोजी आमनेसामने होते. दक्षिण आफ्रिकेने या पाचव्या सामन्यात टॉस जिंकून न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 194 धावा केल्या. न्यूझीलंडला या धावसंख्येपर्यंत पोहचवण्यात अमेलियाने प्रमुख योगदान दिलं. अमेलियाने 55 बॉलमध्ये 105 रन्स केल्या. अमेलियाने या खेळीत 19 चौकार आणि 1 षटकार लगावला.

अमेलिया व्यतिरिक्त दोघींनी 26 आणि 27 धावा केल्या. तर इतरांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. दक्षिण आफ्रिकेसाठी अयाबोंगा खाका आणि तुमी सेखुखुने या दोघींनी प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळवल्या.

दक्षिण आफ्रिका ढेर

त्यानंतर 195 या विजयी धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना अमेलिया केर इतक्याही धावा करता आल्या नाहीत. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 9 आऊट 102 रन्सवर रोखलं. ॲनेरी डर्कसेन हीने सर्वाधिक 23 धावा केल्या. त्या व्यतिरिक्त एकाही महिला फलंदाजाला 20 धावाही करता आल्या नाहीत.

न्यूझीलंडकडून ली ताहूहू हीने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर सोफी डीव्हाईन आणि अमेलिया या दोघींनी दक्षिण आफ्रिकेच्या प्रत्येकी 2-2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर इतर दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

अमेलिया केर मॅन ऑफ द सीरिज

दरम्यान न्यूझीलंडच्या पाचव्या टी 20i सामन्याच्या विजयाची शिल्पकार ठरलेली अमेलिया केर ही मॅन ऑफ द सीरिज ठरली. अमेलिया केर हीने या मालिकेतील 5 सामन्यांमध्ये 276 धावा केल्या. तसेच अमेलियाने 5 विकेट्स मिळवल्या.

अमेलिया केर यासह टी 20i क्रिकेटमधील द्विपक्षीय मालिकेत 250 पेक्षा धावा आणि 5 विकेट्स घेणारी दुसरी महिला फलंदाज ठरली. त्याआधी वेस्ट इंडिजची ऑलराउंडर हॅली मॅथ्यूज हीने अशी कामगिरी केली होती. हॅलीने 2023-2024 मध्ये 250 धावा आणि 5 विकेट्स मिळवल्या होत्या.

Follow Us