NZ vs SA : न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका तिसऱ्या टी 20I सामन्यासाठी सज्ज, कोण घेणार आघाडी?

New Zealand Women vs South Africa Women 3rd T20i : न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेने प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे. त्यामुळे दोन्ही संघांत दुसरा सामना जिंकण्याची चुरस आहे.

NZ vs SA : न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका तिसऱ्या टी 20I सामन्यासाठी सज्ज, कोण घेणार आघाडी?
New Zealand Women vs South Africa Women T20i Series 2026
Image Credit source: Icc X account
Sanjay patil | Updated on: Mar 19, 2026 | 11:22 PM

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका वुमन्स क्रिकेट टीम यांच्यात सध्या 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. ही 5 सामन्यांची टी 20i मालिका 2 सामन्यानंतर 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघांचा विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र दोघांपैकी कोणत्या तरी एकाच संघाचा विजय होईल. तर एका संघाला दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागेल, हे निश्चित आहे. या निमित्ताने उभयसंघातील तिसरा सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा टी 20I सामना कधी?

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा टी 20I सामना शुक्रवारी 20 मार्चला होणार आहे.

Loading...

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा टी 20I सामना कुठे?

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा टी 20I सामना ऑकलंडमधील इडन पार्कमध्ये होणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या टी 20I सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या टी 20I सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी सव्वा सात वाजता सुरुवात होईल. तर 30 मिनिटांआधी टॉस होईल.

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा टी 20I सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा टी 20I सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा टी 20I सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा टी 20I सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे पाहायला मिळेल.

दुसऱ्या सामन्यात काय झालं?

दक्षिण आफ्रिकेने मंगळवारी 17 मार्च रोजी न्यूझीलंडवर मात केली. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला 18 धावांनी पराभूत करत पहिल्या सामन्यातील पराभवाची परतफेड केली. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिका तिसऱ्या सामन्यात सलग दुसरा सामना जिंकून मालिकेत 2-1 ने आघाडी घेण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर यजमान न्यूझीलंडचाही विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न असणार आहे. अमेलिया केर ही न्यूझीलंडचं नेतृत्व करणार आहे. लॉरा वॉल्वॉर्ड्ट हीच्याकडे दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारपदाची सूत्र आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us