रोहितनं कार्तिकसोबत योग्य केलं, रॉबिन उथप्पा असं का म्हणाला?

| Updated on: Sep 22, 2022 | 8:13 PM

मॅचदरम्यान काॅमेंट्री करणारा रॉबिन उथप्पा म्हणाला की, दिनेश कार्तिक बऱ्याचवेळेस फलंदाज बाद होतो तेव्हा रिलॅक्स होताना दिसतो. पण रोहितच्या बाजूनं त्याला सावध करणं ही चांगली गोष्ट आहे.

रोहितनं कार्तिकसोबत योग्य केलं, रॉबिन उथप्पा असं का म्हणाला?
रोहित शर्मा
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली : मोहालीत एक प्रसंग घडला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (IND vs AUS) तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला. याचवेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) हा दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) समजावताना दिसला. याची चांगलीच चर्चा झाली. एकीकडे टीम इंडियाला T20I मालिकेतील पहिल्या सामन्यात चार गडी राखून पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकात 208 धावांची मजबूत धावसंख्या उभारली होती. पण, शेवटी निराश मिळाली. यातच रोहित शर्मा आणि दिनेशचा एक फोटोही व्हायरल झालाय.

नेमकं काय घडलं?

तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिल्या सामन्यात अक्षर पटेल आणि उमेश यादव यांनी 10-14 षटकांत 4 विकेट घेतल्यानं टीम इंडियाचं नुकसान झालं. कॅमेरून ग्रीनशिवाय जोस इंग्लिस, स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल हेही बाद झाले. उमेशनं एकाच षटकात स्मिथ आणि मॅक्सवेलला बाद केलं. पण, दोन्ही वेळा पंचांचा निर्णय नॉट आउट झाला.अशा स्थितीत रोहित शर्मा दिनेश कार्तिकवर चिडलेला दिसून आला. यावेळचा फोटोही व्हायरल झाला.

रॉबिन उथप्पा काय म्हणाला?

मॅचदरम्यान काॅमेंट्री करणारा रॉबिन उथप्पा म्हणाला की, कार्तिक बऱ्याचवेळेस फलंदाज बाद होतो तेव्हा रिलॅक्स होताना दिसतो. पण रोहितच्या बाजूनं त्याला सावध करणं ही चांगली गोष्ट आहे.

स्टार स्पोर्ट्सवर उथप्पा म्हणाला, ‘कधीकधी दिनेशला थोडा आराम मिळतो. कारण, जेव्हा एखादा फलंदाज बाद होतो. तेव्हा तो थोडा शांत होतो. पण रोहित शर्मानं जे केलं ते एकदम चांगलं केलंय. रोहितनं त्याला एकप्रकारे समजावलंय. क्रिकेटमध्ये निवांत राहून चालत नाही.’

पंतपेक्षा कार्तिकला प्राधान्य

टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फलंदाज ऋषभ पंतपेक्षा कार्तिकला प्राधान्य देण्यात आलंय. संघ व्यवस्थापनासाठी हा कठीण निर्णय होता. मात्र, या सामन्यात तो 7व्या क्रमांकावर उतरला आणि 5 धावा करून बाद झाला.

यष्टिरक्षक म्हणूनही त्याचं योगदान वाखाणण्याजोगे नव्हतं. त्यानं एलबीडब्ल्यूला चांगलं आवाहन केलं नाही आणि कर्णधाराला ते पटवून देऊ शकलेलाही नाही. त्यामुळे त्याची कामगिरी आणि निवांतपणा हा त्रासदायक ठरलाय.