हा ड्रेस की फ्रुटशॉप, पाकिस्तानलाच नवी जर्सी पसंत नाही

पुन्हा एकदा पाकिस्तानच्या जर्सीची खिल्ली उडवताना समोर आलंय. एकीकडे पाकिस्तानला त्यांच्या जर्सीवरुन घरचा आहेर मिळतोय. कुणी म्हणतंय कलिंगड, कुणी म्हणतंय टरबूज तर कुणी म्हणतंय फ्रुटशॉप. याविषयी वाचा...

हा ड्रेस की फ्रुटशॉप, पाकिस्तानलाच नवी जर्सी पसंत नाही
पाकिस्तानची जर्सीImage Credit source: social
Follow us
| Updated on: Sep 22, 2022 | 6:53 PM

नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकासाठी (ICC T20 World Cup 2022) पाकिस्ताननं बनवलेल्या जर्सीची (Jersey) खिल्ली उडवली जातेय. हा कलिंग आहे, टरबूज आहे, की फ्रुटची दुकान आहे, असं म्हणत पाकिस्तानच्या (Pakistan) एका क्रिकेटपटून घरचा आहेर दिलाय. यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानच्या जर्सीची खिल्ली उडवताना समोर आलंय. एकीकडे पाकिस्तानला त्यांच्या जर्सीवरुन घरचा आहेर मिळतोय. तर दुसरीकडे टीम इंडियाची जर्सी मात्र सर्वांना आवडली आहे. नेटिझन्सनं देखील या जर्सीचं स्वागत केलंय. हे विशेष.

पाकिस्ताननं सोमवारी आपल्या जर्सीचं अनावरण केलंय. यावेळी कनेरिया म्हणाला की, आधी मला पाकिस्तानच्या किटबद्दल बोलायचंय. टरबूज सारखे वाटते… ‘फ्रूट निन्जा’ नावाचा एक खेळ आहे, तिथे तुम्ही फळ कापता. दोन फळांचे मिश्रण करून त्यांनी ही जर्सी बनवली, असं दिसतंय. तो गडद हिरवा असावा. ही जर्सी पाहून आपण फळांच्या दुकानावर उभे आहोत असं वाटतंय. भारतीय संघाची जर्सी देखील हलक्या रंगाची आहे, ती गडद रंगाची असावी, असं म्हणत त्यानं पाकिस्तानलाच घरचा आहेर दिलाय.

कनेरियानं त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितलंय की, आम्ही विश्वचषकाच्या वाटेवर आहोत. आशिया चषक स्पर्धेनंतर भारत आणि पाकिस्तानकडून आम्हाला ज्या प्रकारची कामगिरी अपेक्षित होती ती कुठेच दिसली नाही. पाकिस्तानचा इंग्लंडकडून पराभव झाला तर भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. आशियातील दोन पॉवरहाऊस संघ आता कुठे आहेत? वेळ कमी आहे आणि तुम्हाला तयारी करावी लागेल, असं तो म्हणाला.

पराभवाचा धक्का

पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागलंय. पाकिस्तानच्या संघाला अद्याप पुनरागमन करण्याची संधी आहे. दोन्ही देशांमध्ये सात सामन्यांची टी-20 मालिका खेळली जातेय. या पराभवामुळे संघाची चिंता नक्कीच वाढलीय.

पाकिस्तानला सल्ला

इंग्लंडविरुद्धच्या पराभवामुळे पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरिया निराश झालाय. 261 बळींसह कसोटीत पाकिस्तानचा आघाडीचा गोलंदाज कनेरिया म्हणाला की, पाकिस्तानला आता आणखी धैर्य दाखवण्याची गरज आहे. यावेळी त्यानं पाकिस्तानच्या जर्सीवर देखील वक्तव्य केलंय.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.