ऐन निवडणूक काळात सुप्रिया सुळेंना धक्का; ‘त्या’ नेत्यानं साथ सोडली, थेट अजितदादा गटात प्रवेश

NCP Ajit Pawar Group : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर येत आहे. शरद पवार गटाच्या नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी देत अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसला आहे. कोण आहे हा नेता? वाचा सविस्तर...

ऐन निवडणूक काळात सुप्रिया सुळेंना धक्का; 'त्या' नेत्यानं साथ सोडली, थेट अजितदादा गटात प्रवेश
Follow us
| Updated on: Apr 29, 2024 | 7:25 PM

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत लक्षवेधी ठरलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात विविध घडामोडी घडत आहेत. जसजसं निवडणुकीची तारीख जवळ येत आहे. तसं तसं घडामोडींना वेग आला आहे. ऐन निवडणूक काळात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्याने वेगळी भूमिका घेतली आहे. ऐन निवडणुकीच्या काळात या नेत्यानं राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. पुणे जिल्ह्यातील भोरच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भोर शहराध्यक्ष यशवंत डाळ यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.

सुप्रिया सुळेंना धक्का

पुण्यातील भोरच्या स्थानिक नेत्यानं अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भोर शहर अध्यक्ष यशवंत डाळ यांनी सुप्रिया सुळे यांची साथ सोडली आहे. सुप्रिया सुळे यांची साथ सोडत पुण्यात यशवंत डाळ यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला.

कुणी केला पक्षप्रवेश?

यशवंत डाळ यांच्यासोबत आणखी काही नेत्यांनीही अजित पवार गटात प्रवेश केला आहे. भोर तालुक्यातील शरद पवार गटाच्या इतर चार महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनीही अजित पवार गटात पक्ष प्रवेश केला आहे. नितिन थोपटे, सोमनाथ ढवळे, बाबू शेटे यांनीही अजित पवार गटात पक्ष प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशावेळी अजित पवार यांच्यासोबत शिवसेनेचे नेते विजय शिवतारेही उपस्थित होते.

यशवंत डाळ यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची भोर विधानसभा मतदारसंघात ताकद वाढणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची ताकद कमी करण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न आहे. निवडणूकीच्या तोंडावर बारामती लोकसभा मतदारसंघात भोरसभेमध्ये महाविकास आघाडीला सलग दुसरा धक्का बसला आहे.

मविआला धक्क्यावर धक्के

मागच्या आठवड्यात ठाकरे गटाचे पुणे जिल्हा संघटक कुलदीप कोंडे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश शिवसेनेत केला होता. त्यानंतर आज शरद पवार गटालाही मोठा धक्का बसला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदानाची तारीख जशी जशी जवळ येत आहे. तसं तसं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीत घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता मतदार कुणाला साथ देणार हे पाहणं महत्वाचं असेल.

Non Stop LIVE Update
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय.
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?.