AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपने घरात भांडणं लावली, आता महागात पडणार; नाना पटोलेंचे गंभीर आरोप

Nana Patole on BJP Baramati Loksabha Election 2024 : काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी भाजपवर गंभीर आरोप केलेत. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषद घेत नाना पटोले यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. नाना पटोले यांनी लोकसभा निवडणुकीवरही भाष्य केलं आहे. वाचा सविस्तर...

भाजपने घरात भांडणं लावली, आता महागात पडणार; नाना पटोलेंचे गंभीर आरोप
| Updated on: Apr 29, 2024 | 6:54 PM
Share

बारामती लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे अवघ्या देशाचं लक्ष आहे. अजित पवार भाजपसोबत गेल्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामतीतून लोकसभा लढत आहेत. त्यामुळे पवार कुटुंबातील दोन व्यक्तींमध्ये ही लढत होत आहे. सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी ही लढत आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केलंय. भाजपने घरात भांडणं लावली आहेत. पवार विरुद्ध पवार असा संघर्ष लावला. आधी 70 हजार कोटींचा आरोप केला. नंतर अजितदादांना मंत्री मंडळात घेतलं. भाजप जे करत आहे, ती राज्याची संस्कृती नाही. हे भाजपला महागात पडेल, असं नाना पटोले म्हणाले.

भाजपवर निशाणा

अजित पवार यांच्याबद्दल काय बोलावं मला कळत नाही. माझं टार्गेट भाजप आहे. नरेंद्र मोदींची राज्यातील भाषणं बघा पाण्यावर शेतीवर ते काहीच बोलत नाहीत. प्रधानमंत्री शेतकरी आत्महत्या यावर बोलतच नाहीत. जे लोक सोबत आहेत. त्यांच्या कारखाना पाहिला आणि 200 कोटी रुपये देण्यात आले. इतरांवर मात्र कारवाई केली, असं म्हणत नाना पटोले यांनी भाजपवर टीकास्त्र डागलं आहे.

काँग्रेसने जी गॅरंटी दिली आहे. त्यामुळे भाजप आणि मोहन भागवत यांना त्रास होत आहे. आगपाखड त्यांची सूर झाला आहे. देशाला सगळ्या गोष्टी दिसत आहे. भाजप आरक्षण विरोध आहे हे कळत आहे. मोदींनी आमच्या भगिनींच्या मंगळसुत्राचा मुद्दा काढला. आम्ही जातीय जनगणना करू आरक्षण देऊ. प्रत्येक समाजला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू. भाजप खालच्या पातळीवर जात राजकारण करत आहे, असंही नाना पटोले म्हणाले.

काँग्रेस निवडणूक जिंकणार- पटोले

विदर्भातील पाचही जागा काँग्रेस जिंकणार आहे. राज्यात आमच्या बाजूने वातावरण आम्ही दिलेल्या जाहीरनामा लोकांनी मान्यता दिली आहे. लोकांनी निवडणूक हातात घेतली आहे. राज्यात चित्र स्पष्ट आहे. पुण्यात देखील बदल होईल. सगळ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघडी जिंकेल. ही निवडणूक मुस्लिम किंवा हिंदूंची नाही. देशाची निवडणूक आहे. संविधान वाचवण्याची आहे. आम्हाला हा वाद करायचा नाही, असं नाना पटोले म्हणाले.

मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.