AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : बँकेत पैसा टिकत नाही? मग करा वास्तुशास्त्रात सांगितलेला हा सोपा उपाय, अन् पहा चमत्कार…

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. आपल्या दैनंदिन जीवनात येणार्‍या समस्यांवर वास्तुशास्त्रामध्ये उपाय सांगण्यात आले आहेत. अनेकांना आर्थिक समस्या असतात, पैसा कितीही कमावला तरी तो हातात टिकत नाही. बँक बॅलन्स वाढत नाही. या समस्या दूर करण्यासाठी आज आपण एक सोपा उपाय जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : बँकेत पैसा टिकत नाही? मग करा वास्तुशास्त्रात सांगितलेला हा सोपा उपाय, अन् पहा चमत्कार...
money Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 18, 2026 | 7:37 PM
Share

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्र महत्त्वाचं आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार जर तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे असेल तर तुमची प्रगती होते, घरात सुख शांती राहते, घराला आर्थिक स्थैर्य लाभतं. मात्र जर तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे नसेल तर तुम्हाला काही अडचणी निर्माण होऊ शकतात. जसं की अनेकदा काहीही कारण नसताना घरात भांडणं होतात, घर नेहमी अंशात राहतं, घरात प्रसन्न वाटत नाही, मन अस्वस्थ होतं, नेहमीच आर्थिक समस्या निर्माण होतात. त्यामुळे ज्यांचा वास्तुशास्त्रावर विश्वास आहे, असे अनेक जण आपल्या घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणेच करतात. वास्तुशास्त्रामध्ये फक्त तुमच्या घराची रचना कशी असावी? याबद्दलच माहिती देण्यात आलेली नाहीये, तर अनेकदा तुमच्या छोट्या-छोट्या चुकांमुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, हा वास्तुदोष दूर कसा करायचा? याबद्दल देखील अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.

अनेकदा आपल्यासोबत असं होतं की, आपण खूप पैसा कमावतो मात्र हातात आलेला पैसा टिकत नाही. पैशांची बचत होत नाही. महिन्याच्या शेवटी आपलं बँक खातं हे पूर्णपणे रिकामं झालेलं असतं. अनपेक्षित खर्च वाढतात, त्यात सर्व पैसा खर्च होऊ जातो. या गोष्टी कशा टाळायच्या? तसेच बँकेत पैसा टिकण्यासाठी काय करावं? याबद्दल वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच एका उपायाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. जर तुमच्याही बँकेत पैसा टिकत नसेल तर त्यासाठी वास्तुशास्त्रात सोपा उपाय सांगण्यात आला आहे. तो म्हणजे कधीही शुक्रवारी किंवा मंगळवारीच बँकेत पैसे जमा करावेत, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

मंगळवार आणि शुक्रवार हे दोन देवीचे वार आहेत. लक्ष्मी मातेला धनाची देवता म्हटलं जातं. त्यामुळे या दोन वारी बँकेत पैसे जमा करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळे तुमच्या सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतात. एवढंच नाही तर बँकेत देखील पैसा टिकतो. त्याचसोबत तुमच्या घराच्या भिंतीवर उत्तर दिशेला कुबेराचा फोटो लावावा. उत्तर दिशा ही कुबेरांची आवडती दिशा आहे. कुबेरालाही धनाची देवता म्हटलं जातं. जर तुम्ही तुमच्या घरात उत्तर दिशेला कुबेराचा फोटो लावला तर घरात येणाऱ्या धनाची आवक वाढते, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
आता तरी सुषमाताईंना पक्षाने...सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय...
आता तरी सुषमाताईंना पक्षाने...सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
दिवसभर काम आणि अनेक दौरे केल्यानंतर... रोहित पवारांना नेमकं काय झालंय?
दिवसभर काम आणि अनेक दौरे केल्यानंतर... रोहित पवारांना नेमकं काय झालंय? ब्रीच कँडी रुग्णालयातील व्हिडीओ आला समोर
26 फेब्रुवारीच्या बैठकीत घडलं ते... निवडणूक आयोगाकडून NCP ला तातडीचे न
Sunetra Pawar | निवडणूक आयोगाकडून NCP ला तातडीचे निर्देश; 26 फेब्रुवारीच्या बैठकीत घडलं ते...
उद्धव ठाकरेंना आणखी मोठा हादरा! विश्वासू महिला नेत्याच्या राजीनाम्यानं
उद्धव ठाकरेंना आणखी मोठा हादरा! विश्वासू महिला नेत्याच्या राजीनाम्यानंतर...
ट्रेकिंगचा थरार ठरला जीवघेणा! दरीत पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
मोठी बातमी! रायगडमध्ये ट्रेकिंगचा थरार ठरला जीवघेणा! दरीत पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
मोठी बातमी! Gen Z बाबत सरसंघचालक मोहन भागवत यांचा मोठा निर्णय; मुंबईत
मोठी बातमी! Gen Z बाबत सरसंघचालक मोहन भागवत यांचा मोठा निर्णय; मुंबईत तब्बल 2000...
माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतं की...; पंकजा मुंडेंनंतर आता धनंजय मुंडे
माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतं की...; पंकजा मुंडेंनंतर आता धनंजय मुंडेंचंही मोठं विधान
मोठी उलथापालथ! वाशिममध्ये भाजपचा मविआला जबर धक्का, अनेक नेते...
मोठी उलथापालथ! वाशिममध्ये भाजपचा मविआला जबर धक्का, अनेक नेते, पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाने खळबळ!
धनंजय मुंडेंच्या निवृत्तीच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंची फटकेबाजी...
धनंजय मुंडेंच्या निवृत्तीच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंची फटकेबाजी, म्हणाले मराठ्यांच्या नादी ...
CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या; कोर्टाचे सर्व...
मोठा दिलासा! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या; कोर्टाचे सर्व राज्यांना आदेश