AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण एकटं तरीही दहशत प्रचंड, इराणच्या भीतीमुळे मित्र राष्ट्राचाच अमेरिकेला सर्वात मोठा दणका, ट्रम्प यांचा मोठा गेम

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू असतानाच आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. मित्र राष्ट्रानेच ट्रम्प यांचा मोठा गेम केला आहे.

इराण एकटं तरीही दहशत प्रचंड, इराणच्या भीतीमुळे मित्र राष्ट्राचाच अमेरिकेला सर्वात मोठा दणका, ट्रम्प यांचा मोठा गेम
trump Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 18, 2026 | 6:03 PM
Share

इराण आणि अमेरिकेमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता तुर्कीमधून मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे अमेरिकेनं तुर्कीमध्ये आपले फायटर जेट उतरवण्याची परवानगी मागीतली होती. मात्र तुर्कीकडून आपल्या भूमीवर फायटर जेट उतरवण्यासाठी अमेरिकेला नकार देण्यात आला आहे. हा अमेरिकेसाठी सर्वात मोठा झटका मानाला जात आहे. कारण तुर्की हा नाटोचा सदस्य देश आहे. मात्र अद्याप तुर्कीकडून यावर कोणतंही अधिकृत स्टेटमेंट समोर आलेलं नाहीये. मध्य पूर्व इन्स्टिट्यूटच्या तुर्की कार्यक्रमाचे संस्थापक गोनुल टोल यांनी अमेरिकन सैन्य अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं या संदर्भात ही माहिती दिली आहे.

युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकेनं तुर्कीला संपर्क केला होता. अमेरिकेला असं वाटत होतं की, इंधन भरण्यासाठी तुर्कीने आपल्या फायटर जेटला त्यांच्या भूमीवर उतरू द्यावं. त्यासाठी अमेरिकेनं तुर्कीशी संपर्क देखील साधला होता. मात्र अमेरिकेच्या विनंतीला तुर्कीकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही, असं गोनुल टोल यांनी म्हटलं आहे. अमेरिकेला त्यांच्या फायटर जेटमध्ये इंधन भरण्यासाठी तुर्कीच्या मदतीची गरज आहे. त्यासाठी अमेरिकेनं तुर्कीच्या राष्ट्रपती कार्यालयाशी संपर्क केला होता, त्यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. मात्र तुर्कीने ही मागणी मान्य केली नसल्याचं देखील गोनुल टोल यांनी म्हटलं आहे.

तुर्कीची भूमिका काय?

इराण, अमेरिका आणि इस्त्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. विशेष म्हणजे तुर्की हा नाटोचा सदस्य देश असल्यामुळे तुर्कीने आपल्याला मदत करावी अशी अमेरिकेची इच्छा आहे. तुर्की या युद्धासाठी पूर्णपणे इस्त्रायलला जबाबदार मानत आहे. तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोआन यांनी युद्धाच्या पहिल्याच दिवशी संसदेमध्ये बोलताना म्हटलं होतं, की हे युद्ध लवकरात लवकर संपवावं लागेल, नाहीतर संपूर्ण मध्य पूर्वेत या युद्धाचा भडका उडेल. दरम्यान सध्या तुर्की या युद्धात मध्यस्थाची भूमिका पार पडत आहे.

Follow Us
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?