AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR vs DC : कोलकाता विरुद्ध दिल्लीने टॉस जिंकला, बॅटिंग कुणाची?

Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Toss : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्सने टॉस जिंकला आहे. पाहा दोन्ही संघांच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोण आहे?

KKR vs DC : कोलकाता विरुद्ध दिल्लीने टॉस जिंकला, बॅटिंग कुणाची?
Image Credit source: BCCI/IPL
| Updated on: Apr 29, 2024 | 7:45 PM
Share

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 47 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने आहेत. ऋषभ पंत याच्याकडे दिल्ली कॅपिट्ल्सचं नेतृत्व आहे. तर श्रेयस अय्यर कोलकाताची कॅप्टन्सी करणार आहे. या सामन्याचं आयोजन हे ईडन गार्डनमध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. दिल्लीच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन ऋषभ पंतने पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघात बदल

दिल्ली आणि कोलकाता या दोन्ही संघांनी प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल केला आहे. दिल्लीने सलामीवीर पृथ्वी शॉ याला कुमार कुशाग्रा याच्या जागी संधी दिली आहे. सतर रसीख डार सलाम याचा मुकेश कुमार याच्या जागी समावेश करण्यात आला आहे. तर कोलकाता टीममध्ये आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागड्या गोलंदाजाची एन्ट्री झाली आहे. मिचेल स्टार्कला वैभव अरोराच्या जागी संधी दिली गेली आहे.

दिल्ली पराभवाचा वचपा घेणार?

दिल्ली विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ या मोसमात दुसऱ्यांदा आमनेसामने आले आहेत. याआधी 3 एप्रिल रोजी उभयसंघात आमनासामना झाला होता. तेव्हा केकेआरने मोठ्या फरकाने दिल्लीचा धुव्वा उडवला होता. कोलकाताने तेव्हा दिल्लीवर 106 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे आता दिल्लीकडे केकेआरचा पराभव करुन गेल्या पराभवाचा वचपा घेऊन प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याची दुहेरी संधी आहे. आता यात कोण यशस्वी ठरणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

दिल्लीने टॉस जिंकला

कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रसिक दार सलाम, लिझाद विल्यम्स आणि खलील अहमद.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.