3 वर्षांपासून टीम इंडियात संधी नाही, पण आता एका सामन्यात हॅटट्रिकसह 10 विकेट्स घेत धुरंधर गोलंदाजानं मैदान गाजवलं

Sai Kishore Takes Hat-Trick and 10 Wickets: रणजी ट्रॉफी २०२६-२७ च्या दुसऱ्या फेरीत तामिळनाडूने उत्तराखंडचा एक डाव आणि ६६ धावांनी पराभव केला.

3 वर्षांपासून टीम इंडियात संधी नाही, पण आता एका सामन्यात हॅटट्रिकसह 10 विकेट्स घेत धुरंधर गोलंदाजानं मैदान गाजवलं
| Updated on: Oct 20, 2026 | 3:41 PM

गेल्या तीन वर्षांपासून भारतीय संघात निवड न झालेला आणि गेल्या तीन वर्षांपासून चांगली कामगिरी करूनही निवड समितीचे लक्ष वेधून न घेतलेला खेळाडू आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तामिळनाडूचा डावखुरा फिरकी गोलंदाज साई किशोरने रणजी ट्रॉफीमध्ये झारखंडविरुद्ध शानदार गोलंदाजी करत हॅट-ट्रिक घेतली. साई किशोरने या सामन्यात १० बळी घेतले. तसेच तामिळनाडूने हा सामना एक डाव आणि ६६ धावांनी जिंकला.

चेन्नईतील एम. चिदंबरम स्टेडियमवर साई किशोरने उत्तराखंडच्या फलंदाजांना एक इंचही हालचाल करू दिली नाही. त्याने दुसऱ्या डावात हॅट-ट्रिकसह सहा बळी घेतले. त्याने ४३ व्या षटकात आपली हॅट-ट्रिक पूर्ण केली. त्याने प्रथम लक्ष्य रायचंदानीला १९ धावांवर बाद केले. त्यानंतर त्याने सौरभ रावत आणि मग आदित्य रावतला बाद करून आपली हॅट-ट्रिक पूर्ण केली. साई किशोरने पहिल्या डावात चार बळी घेतले. ज्यामुळे सामन्यातील त्याच्या बळींची संख्या १० झाली.

Loading...

साई किशोरने भारतीय संघासाठी तीन टी-२० सामने खेळले आहे. त्यात चार बळी घेतले आहेत. त्याने २०२३ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते, परंतु त्यानंतर त्याची निवड झालेली नाही. अशी आशा आहे की त्याची हॅट-ट्रिक निवड समितीचे लक्ष वेधून घेईल. रणजी ट्रॉफीमध्ये तामिळनाडूसाठी हॅट-ट्रिक घेणारा साई किशोर हा केवळ ८वा गोलंदाज आहे. बी.एस. कल्याणसुंदरम यांनी १९७२-७३ मध्ये तमिळनाडूसाठी सर्वप्रथम हॅट-ट्रिक घेतली. भरत अरुणने १९८६/८७ मध्ये गोव्याविरुद्ध हॅट-ट्रिक घेतली.

सुनील सुब्रमण्यम यांनी १९९२/९३ मध्ये केरळविरुद्ध हॅट-ट्रिक घेण्याचा पराक्रम केला. दामोदरन देवानंद यांनी १९९८/९९ मध्ये ओरिसाविरुद्ध हॅट-ट्रिक घेण्याचा पराक्रम केला. आर. रामकुमारने २००३/०४ मध्ये कर्नाटकविरुद्ध हॅट-ट्रिक घेण्याचा पराक्रम केला. एम. मोहम्मदने २०१८/१९ मध्ये मध्य प्रदेशविरुद्ध हॅट-ट्रिक घेतली. गुर्जपनीत सिंगने २०२५/२६ च्या शेवटच्या रणजी हंगामात नागालँडविरुद्ध हॅट-ट्रिक घेण्याचा पराक्रम केला. साई किशोरने २०२६/२७ च्या रणजी हंगामात उत्तराखंडविरुद्ध हॅट-ट्रिक घेण्याचा पराक्रम केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us