शेन वार्नची लेक ढसाढसा रडली, म्हणली लाज नाही वाटत…

| Updated on: Sep 16, 2022 | 6:57 PM

शेन वार्नची लेक ढसाढसा रडायलाच लागली, असं नेमकं काय झालं, ते जाणून घ्या....

शेन वार्नची लेक ढसाढसा रडली, म्हणली लाज नाही वाटत...
शेन वार्न आणि त्याची लेक ब्रुक
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा (Australian cricketer) दिग्गज खेळाडू शेन वॉर्न (Shane Warne) याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. वॉर्नच्या आकस्मिक निधनानं त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. प्रत्येकानं आपापल्या शैलीत वॉर्नला आदरांजली वाहिली. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या चॅनल 9नं वॉर्नच्या जीवनावर एक टेलिफिल्म बनवण्याचा निर्णय घेतला. मात्र, ही कल्पना वॉर्नच्या कुटुंबीयांना अजिबात आवडली नाही आणि वॉर्नची मुलगी ब्रुक (Brooke Warne) भडकली.

नेमकं काय झालं?

शेन वॉर्नर याला लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे श्रद्धांजली वाहिली. चॅनल 9 च्या प्रवक्त्यानं सांगितले की हे वॉर्नचं जीवन साजरं करण्यासारखं आहे. ती म्हणाला, ‘एक माणूस ज्यानं एक अद्भुत जीवन जगलं आणि ज्याला खूप प्रेम मिळालं. शेन वॉर्नच्या कामगिरीबद्दल आम्हाला खूप आदर आहे. आम्हाला आशा आहे की वॉर्नचं कुटुंब आणि सर्व ऑस्ट्रेलियन लोकांना ते आवडेल. चॅनल 9 वर वॉर्नरच्या आयुष्यावर टेली-फिल्म बनव होतं.

वॉर्नच्या लेक भडकली

वॉर्नची मोठी मुलगी ब्रुक वॉर्न आणि मॅनेजर यांनी चॅनल 9 वर वॉर्नरच्या आयुष्यावर टेली-फिल्म बनवल्याबद्दल आक्षेप घेतला.  25 वर्षीय ब्रूकने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले, ‘तुमच्या मनात माझ्या वडिलांबद्दल आदर आहे का? की त्याच्या कुटुंबासाठी? त्याने तुमच्यासाठी खूप काही केले आणि त्याच्या मृत्यूनंतर फक्त 6 महिन्यांतच तुम्हाला त्याचे आयुष्य आणि कुटुंब एक नाटक बनवायचे आहे?, असं ब्रुकनं लिहिलंय.

‘त्या चॅनलला लाज वाटली पाहिजे…’

वॉर्नचे अधिक काळ व्यवस्थापक असलेले जेम्स एरस्काइन यांनीही याला चुकीचं म्हटलंय आहे. चॅनल 9 ला लाज वाटली पाहिजे असे ते म्हणाले. त्याने द सनला सांगितले, ‘त्याच्या मृत्यूला काही आठवडेच झाले आहेत. अशी खळबळजनक ऑफर त्यांच्या मृत्यूवर दिली जात आहे. स्वतःची लाज वाटली पाहिजे. वॉर्न 20 वर्षांपासून चॅनल 9शी जोडला होता आणि समालोचनही करत असे. वॉर्नच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी चॅनल 9 नेटवर्कने यावर काम सुरू केल्याचे मानलं जातंय. हीच वॉर्नला खरी श्रद्धांजली ठरेल, असं त्यांना वाटते. मात्र, वार्नरच्या कुटुंबियांना हे मान्य नाही.

जगातील महान गोलंदाजांपैकी एक असलेला ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्न याचं 4 मार्च रोजी निधन झालं होतं. ते 52 वर्षांचे होते. वॉर्नच्या व्यवस्थापनाने जारी केलेल्या निवेदनात असे सांगण्यात आले की, महान लेगस्पिनरचे थायलंडमधील कोह सामुई येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.