पाकिस्तानचा कॅप्टन आहे की हिटलर? बाबर आजम विरोधात बोललात तर थेट….

तुम्ही बाबर आजमच्या टीममध्ये बोलू शकत नाही. पाकिस्तानी खेळाडूंनी तोंड बंद ठेवलं, तर त्यांना टीममध्ये संधी मिळेल. म्हणजे विरोधात बोललात, तर टीमबाहेर जावं लागेल.

पाकिस्तानचा कॅप्टन आहे की हिटलर? बाबर आजम विरोधात बोललात तर थेट....
बाबर आझम Image Credit source: social
Follow us
| Updated on: Sep 16, 2022 | 4:44 PM

मुंबई: तुम्ही बाबर आजमच्या टीममध्ये बोलू शकत नाही. पाकिस्तानी खेळाडूंनी तोंड बंद ठेवलं, तर त्यांना टीममध्ये संधी मिळेल. म्हणजे विरोधात बोललात, तर टीमबाहेर जावं लागेल. टी 20 वर्ल्ड कप टीमच्या घोषणेनंतर असंच चित्र दिसतय. शान मसूदची या टीममध्ये निवड झाली. त्याचवेळी शोएब मलिक आणि इमाद वसीमकडे चांगल्या प्रदर्शनानंतरही दुर्लक्ष करण्यात आलं. ही तीन नावच त्याचे पुरावे आहेत.

शेवटची वनडे तो 2019 मध्ये खेळला

शान मसूदने अजूनपर्यंत पाकिस्तानसाठी टी 20 मध्ये डेब्यु केलेला नाही. त्याने पाकिस्तानसाठी 2021 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. शेवटची वनडे तो 2019 मध्ये खेळला होता. मात्र तरीही पीसीबीने त्यावर विश्वास दाखवला. वर्ल्ड कप टीममध्ये निवड केली.

टीमबाहेर असतानाही मसूद शांत होता

मागच्या महिन्यात नॅशनल टी 20 कपमध्ये त्याने 9 सामन्यात बलुचिस्तानसाठी 2 अर्धशतकं झळकावली. त्याशिवाय त्याची बॅट फार चालली नाही. मसूदच्या निवडीमागे सोशल मीडियावरील त्याच वर्तन असल्याचं म्हटलं जातय. पाकिस्तानी टीमबाहेर असतानाही मसूद शांत होता. त्याने त्याच क्रिकेट खेळणं सुरु ठेवलेलं. सोशल मीडियावर कुठलीही उलट-सुलट बडबड केली नाही. क्रिकेट एक्सपर्ट्सच्या मते त्याचं फळ त्याला आज मिळालं.

शोएब टि्वटमुळे बाहेर

शोएब मलिककडे दुर्लक्ष करण्यामागे त्याचं टि्वट असल्याचं म्हटलं जातय. पाकिस्तानची टीम आशिया कपची फायनल हरली. त्यानंतर शोएबने बाबर आजमवर निशाणा साधणार टि्वट केलं. मैत्री, आवडीचा-निवडीचा या संस्कृतीमधून आपण कधी बाहेर पडणार असं त्याने त्या टि्वटमध्ये म्हटलं होतं. हेच टि्वट शोएबवर भारी पडलं, असं आता म्हटलं जातय.

इमादने कोहलीच कौतुक केलं होतं

शोएबशिवाय इमाद वसीम तिसरा पुरावा आहे. त्याच्याकडेही दुर्लक्ष करण्यात आलं. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये त्याने शानदार प्रदर्शन केलय. इमाद वसीमने काही दिवसांपूर्वी आशिया कपमधील विराटच्या शतकाच कौतुक केलं होतं. त्याला पृथ्वीवरील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हटलं होतं. त्यासाठी इमाद वसीमला पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं.

Non Stop LIVE Update
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक.
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा.
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने.
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात.
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.