काही लोक काहीपण सांगतात, सरकार काय त्यांच्या…, अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचार सभेला हजेरी लावली होती. सध्या याच प्रचार सभेतील अजित पवार यांच्या भाषणाची जोरदार चर्चा रंगली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या सभेला हजर झाले होते. यावेळी अजित पवार यांनी सभेमधील भाषणात म्हटलं आहे की, मी सर्व समाजासाठीच्या विभागांना निधी दिला आहे. सर्वजण आपली आहेत त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मी निधी दिला. कुठेही निधी देताना मी भेदभाव केला नाही. अल्पसंख्याक विभागाच्या केसालाही धक्का लागणार नाही. तुम्ही अजिबात काळजी करु नका. असं देखील अजित पवार प्रचार सभेमध्ये बोलले.
Latest Videos
Latest News