IPL 2024 Points Table: कोलकाताची विजयासह प्लेऑफमध्ये धडक, पॉइंट्स टेबलमध्ये आता जोरदार चुरस
IPL Points Table 2024 60th Match : आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 60 सामन्यानंतर अखेर प्लेऑफची पहिली टीम निश्चित झाली आहे.

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 60 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने घरच्या मैदानात ईडन गार्डनमध्ये मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी विजय मिळवला आहे. पावसामुळे 16 ओव्हरच्या झालेल्या सामन्यात केकेआरने मुंबईसमोर 158 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईची या धावांचा पाठलाग करताना शानदार सुरुवात झाली होती. रोहित शर्मा आणि ईशान किशन या सलामी जोडीने 65 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर केकेआरच्या गोलंदाजांनी मुंबईला ठराविक अतंराने झटके दिले. मुंबईला 16 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 139 धावांपर्यंतच मजल मारता आली.
कोलकाताने मुंबईवर या हंगामात मिळवलेला हा दुसरा विजय ठरला. केकेआरने या विजायसह प्लेऑफमध्ये धडक मारली. केकेआर या हंगामात प्लेऑफमध्ये पोहचणारी पहिली टीम ठरली. तब्बल 60 सामन्यांच्या प्रतिक्षेनंतर प्लेऑफसाठी पात्र ठरणारी टीम असा बहुमान केकेआरने मिळवला. केकेआर पॉइंट्स टेबलमध्ये 18 गुण आणि +1.428 नेट रनरेटसह अव्वल स्थानी कायम आहे. आता केकेआरचे या हंगामातील आणखी 2 सामने बाकी आहेत. केकेआरचं या 2 सामन्यात विजय मिळवून टॉप 2 मध्ये कायम राहण्याचा प्रयत्न असेल. प्लेऑफसाठी पात्र ठरणाऱ्या 4 पैकी पहिल्या 2 संघांना फायनलमध्ये पोहचण्यासाठी 2 संधी मिळतात. केकेआरचा तसाच मानस 2 सामने जिंकण्यामागे असणार आहे.
आता केकेआरने प्लेऑफमध्ये धडक दिल्याने उर्वरित 3 जागांसाठी 7 संघांमध्ये रस्सीखेच असणार आहे. रविवारी 12 मे रोजी डबल हेडर पार पडणार आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने असणार आहेत. चेन्नईसाठी हा करो या मरो असा सामना असणार आहे. तर दुसऱ्या सामन्यात आरसीबी विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स भिडणार आहेत. दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मरो असा आहे. त्यामुळे पराभूत होणाऱ्या संघाचं आव्हान इथेच संपुष्टात येईल. त्यामुळे रविवारी नक्की कोण बाजी मारणार, याकडे लक्ष असणार आहे.
कोरोबा, लोरबो, जितबो रे
TOP OF THE TABLE. FIRST TEAM TO QUALIFY. pic.twitter.com/udKRGy9h1w
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 11, 2024
कोलकाता नाईट रायडर्स प्लेईंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, नितीश राणा, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.
मुंबई इंडियन्स प्लेईंग ईलेव्हन : हार्दिक पंड्या (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, अंशुल कंबोज, पियुष चावला, जसप्रीत बुमराह आणि नुवान तुषारा.
