T20I : वर्ल्ड कप सेमी फायनलनंतर दक्षिण आफ्रिका-न्यूझीलंड पुन्हा भिडणार, तारीखही फिक्स

New Zealand vs South Africa T20i : दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत न्यूझीलंडसमोर 170 धावांचं सन्मानजनक आव्हान ठेवलं होतं. मात्र फिन एलनच्या चाबूक शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने हे आव्हान सहज पूर्ण केलं आणि विजय मिळवला. त्यानंतर आता दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने असणार आहेत.

T20I : वर्ल्ड कप सेमी फायनलनंतर दक्षिण आफ्रिका-न्यूझीलंड पुन्हा भिडणार, तारीखही फिक्स
New Zealand vs South Africa T20i Cricket
Image Credit source: Icc Facebook Page
| Updated on: Mar 05, 2026 | 4:33 PM

न्यूझीलंड क्रिकेट टीमने बुधवारी 4 मार्च रोजी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेवर मात केली. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर कोलकातातील इडन गार्डन्समध्ये झालेल्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. न्यूझीलंडने या विजयासह अंतिम फेरीत धडक दिली. तर दक्षिण आफ्रिकेचं पराभवासह पॅकअप झालं. न्यूझीलंडची दक्षिण आफ्रिकेला आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात 6 सामन्यांनंतर पराभूत करण्याची पहिलीच वेळ ठरली. आता न्यूझीलंड भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील विजयी संघाविरुद्ध 8 मार्चला अंतिम फेरीत 2 हात करणार आहे.

न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका पुन्हा भिडणार, 15 मार्चपासून टी 20i मालिका

दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेत इथवर अजिंक्य राहत अप्रतिम कामगिरी केली होती. मात्र एका पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेची मेहनत वाया गेली. दक्षिण आफ्रिका गेल्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतही अंतिम फेरीपर्यंत अजिंक्य होती. मात्र भारताने त्यांना फायनलमध्ये पराभूत केलं आणि वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं.

आता वर्ल्ड कपमध्ये उपांत्य फेरीत आमनेसामने आलेले दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड संघ पुन्हा एकदा 2 हात करणार आहेत. न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात एकूण 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे. दक्षिण आफ्रिका या टी 20i मालिकेसाठी न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.

टी 20i मालिकेबाबत थोडक्यात

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 15 ते 25 मार्च दरम्यान ही टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे. एडन मार्करम दक्षिण आफ्रिकेचं आणि मिचेल सँटनर न्यूझीलंडचं नेतृत्व करणार आहेत.

टी 20i मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 15 मार्च, न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, बे ओव्हल, माउंट मौंगानुई.

दुसरा सामना, 17 मार्च, न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, हॅमिल्टन, सीडन पार्क.

तिसरा सामना, 20 मार्च, न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ऑकलंड, इडन पार्क.

चौथा सामना, 22 मार्च, न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, वेलिंग्टन, स्काय स्टेडियम

पाचवा आणि अंतिम सामना, 25 मार्च, न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ख्राईस्टचर्च.

संघाची घोषणा होणं बाकी

दरम्यान अद्याप या टी 20i मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडकडून संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. टी 20i वर्ल्ड कप फायनलनंतरच संघ जाहीर केला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Follow Us