IND VS SA ODI: दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख गोलंदाज वनडे सीरीजआधी संघाबाहेर, कसोटीत ठरला होता कर्दनकाळ

| Updated on: Jan 18, 2022 | 9:47 PM

1 / 5
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा (Kagiso Rabada) बुधवारपासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेत खेळणार नाहीय. रबाडा दुखापतग्रस्त नाहीय पण दक्षिण आफ्रिकेच्या संघाने त्याला रिलीज केलय. राबाडा दक्षिण आफ्रिकेने आराम दिलाय. वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत दक्षिण आफ्रिकन संघाने हा निर्णय घेतलाय.

2 / 5
कागिसो रबाडाने कसोटी मालिकेत भारताला चांगलचं सतावल होतं. त्याने तीन कसोटीमध्ये सर्वाधिक 20 विकेट घेतल्या होत्या. कागिसो रबाडा सारखा गोलंदाज वनडे संघात नसल्यामुळे दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी थोडी दुबळी होईल. दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख गोलंदाज एनरिक नॉर्खियाही वनडे मालिकेत खेळत नाहीय.

3 / 5
दक्षिण आफ्रिकेकडे रबाडाला पर्याय उपलब्ध आहे. सिसांदा मगाला, एंडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस आणि वेन पार्नेल सारखे गोलंदाज त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. मार्को जॅनसेनचाही वनडे संघात समावेश करण्यात आला आहे. त्याने रबाडानंतर सर्वाधिक 19 विकेट घेतल्या होत्या.

4 / 5
कागिसो रबाडा वनडे सीरीजमध्ये खेळत नाहीय, ही भारतासाठी दिलासादायक बाब आहे. 26 वर्षाच्या रबाडाने भारताविरुद्ध वनडे फॉर्मेटमध्ये 12 सामन्यात 17 विकेट घेतल्यात. दक्षिण आफ्रिकेत रबाडा जास्त घातक आहे. त्याने 37 सामन्यात 54 विकेट घेतल्यात.

5 / 5
पहिल्या वनडेसाठी दक्षिण आफ्रिकेचा असा संभाव्य संघ असू शकतो - क्विंटन डिकॉक, यानेमन मलान, टेंबा बावुमा, एडन मार्करम, रासी वान डर डुसे, डेविड मिलर, एंडिले फेहलुकवायो, मार्को जॅनसेन, तबरेज शम्सी, ड्वेन प्रियोरियस आणि लुंगी निगीडी.