
सूर्यकुमार यादव याने अवघ्या काही वर्षात टीम इंडियाच्या टी 20i संघाचं नेतृत्व मिळवलं. मात्र सूर्याला वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये आपलं स्थान मिळवता आलेलं नाही. सूर्या टीम इंडियासाठी फक्त एकमेव कसोटी खेळला आहे. अशात सूर्याचा बांगलादेश विरूद्ध मायदेशात होणाऱ्या कसोटी मालिकेतून कमबॅक करण्याचा मानस होता. मात्र त्याआधी सूर्याला मोठा झटका लागला आहे. सूर्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. नक्की काय झालंय? जाणून घेऊयात.
दुलीप ट्रॉफी स्पर्धेला 5 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या दुलीप स्पर्धेपासूनच देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेचा श्रीगणेशा होत आहे. या स्पर्धेत आपली छाप सोडून बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेत स्थान मिळवण्याची संधी अनेक खेळाडूंकडे आहे. यामध्ये सूर्यकुमार यादवचंही नाव आघाडीवर आहे. मात्र त्याआधी सूर्या दुर्देवी ठरला आहे. सूर्याला दुखापतीमुळे दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावं लागणार आहे.
सूर्याला बूची बाबू स्पर्धेत टीएनसीए 11 विरूद्धच्या सामन्यात हाताला दुखापत झाली. सूर्या या दुखापतीमुळे या सामन्यातील दुसऱ्या डावात बॅटिंगही करु शकला नाही. सूर्याला आता विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. सूर्या आता बंगळुरुतील एनसीएमध्ये पुढील काही दिवस असणार आहे. सूर्या तिथे दुखापतीतून पूर्णपणे फीट होण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार आहे.
सूर्यकुमारला दुखापत
Suryakumar Yadav ruled out of the first round of the Duleep Trophy due to a hand injury. (Espncricinfo). pic.twitter.com/NAenKK2Obj
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 2, 2024
सूर्याच्या हाताला मुंबई विरुद्ध टीएनसीए 11 या सामन्यातील तिसऱ्या दिवशी फिल्डिंग दरम्यान दुखापत झाली होती. सूर्याने टीम इंडियात कमबॅक करण्याबाबतची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे सूर्याचं दुलीप ट्रॉफी उल्लेखनीय कामगिरी करण्याकचं लक्ष्य होतं. मात्र आता सूर्याला दुखापतीमुळे बाहेर रहावं लागणार असल्याचं चित्र आहे. दरम्यान सूर्याने टीम इंडियासाठी एकमेव कसोटी सामनाच खेळला आहे. सूर्याला पदार्पणातील सामन्यात काही खास करता आलं नव्हतं. सूर्याने या सामन्यात केवळ 8 धावाच केल्या होत्या. मात्र त्यानंतर सूर्याला संधीच मिळाली नाही. त्यामुळे सूर्या संधी तयार करण्यासाठी सज्ज होता. मात्र त्याला आता दुखापत झालीय.