दोन महिन्यांची प्रतीक्षा अन् 24 चेंडूंचा खेळ! भारताचा ‘हा’ स्टार खेळाडू अफगाणिस्तान मालिकेला मुकणार

टीम इंडियाने अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. आता दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घालण्याचा मानस आहे. असं असताना टीम इंडियाला धक्का बसला आहे. मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती जखमी झाला आहे.

दोन महिन्यांची प्रतीक्षा अन् 24 चेंडूंचा खेळ! भारताचा हा स्टार खेळाडू अफगाणिस्तान मालिकेला मुकणार
दोन महिन्यांची प्रतीक्षा अन् 24 चेंडूंचा खेळ! भारताचा 'हा' स्टार खेळाडू अफगाणिस्तान मालिकेला मुकणार
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Sep 14, 2026 | 7:22 PM

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेतून भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. असं असलं तरी या सामन्यातून पुनरागमन करणारा स्टार मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती पुन्हा एकदा दुखापतग्रस्त झाला आहे. पहिल्या सामन्यात आपल्या कोट्याची 4 षटके पूर्ण टाकल्यानंतर त्याला तीव्र त्रास जाणवू लागला. ज्यामुळे तो आता उर्वरित दोन्ही सामन्यांना मुकणार आहे. वरुण चक्रवर्तीने चार षटकात 16 धावा देऊन 1 विकेट काढली होती.

दोन महिन्यांचे कष्ट अन् अवघ्या 4 षटकांत खेळ खल्लास

वरुण चक्रवर्ती जुलै महिन्यात झालेल्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर पुनरागमनासाठी त्याने तब्बल दोन महिने बेंगळुरू येथील बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सीलेंस’मध्ये घालवले आणि फिटनेस टेस्ट पास करून संघात पुनरागमन केले. मात्र, अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या सामन्यात अवघी 4 षटके गोलंदाजी केल्यानंतर तो पुन्हा जखमी झाला. अवघ्या एका सामन्यात खेळाडू पुन्हा दुखापतग्रस्त झाल्यामुळे ‘सेंटर ऑफ एक्सीलेंस’ने दिलेल्या फिटनेस क्लिअरन्सवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

CoE च्या फिटनेस क्लिअरन्सवर खेळाडूंचा ‘हा’ मोठा इतिहास

खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त होण्याआधीच त्यांना ‘फिट’ घोषित करण्याचा हा प्रकार केवळ वरुण चक्रवर्तीसोबत घडलेला नाही. यापूर्वी हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी आणि जसप्रीत बुमराह यांच्यासारख्या बड्या खेळाडूंनाही अशाच पद्धतीने रिहॅबनंतर लागलीच पुन्हा दुखापतींचा सामना करावा लागला आहे. वेगवान गोलंदाज हर्षित राणा हा देखील असाच एक खेळाडू आहे, जो इंग्लंड मालिकेतून दुखापतग्रस्त होऊन परतला होता. सीओईमध्ये असतानाही तो पूर्णपणे सावरू शकला नाही आणि त्याला आगामी स्पर्धांमधून बाहेर व्हावे लागले.

रवी बिश्नोईला संघात संधी मिळण्याची दाट शक्यता

वरुण चक्रवर्ती उर्वरित मालिकेतून बाहेर पडल्यामुळे आता भारतीय संघात लेग-स्पिनर रवी बिश्नोईला खेळण्याची सुवर्णसंधी मिळू शकते. बिश्नोईची टी20 आकडेवारी अत्यंत दमदार असून, भारतीय संघाने आतापर्यंत खेळलेल्या 49 सामन्यांमध्ये तब्बल 67 विकेट्स घेतल्या आहेत. चक्रवर्तीच्या अनुपस्थितीत बिश्नोईची निवड झाली तर मधल्या षटकांमध्ये अफगाणिस्तानच्या फलंदाजांना रोखण्याची मोठी जबाबदारी असेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us