Virat Kohli: एक्स्ट्रा कव्हरमध्ये फ्लॅट SIX मारल्यानंतर विराट कोहलीची ‘कडक’ Reaction पहा VIDEO

विराट कोहलीने लेफ्टी वेगवान बॉलरला किती सहज सिक्स मारला एकदा VIDEO बघा

Virat Kohli: एक्स्ट्रा कव्हरमध्ये फ्लॅट SIX मारल्यानंतर विराट कोहलीची कडक Reaction पहा VIDEO
Virat kohli
Image Credit source: icc
| Updated on: Oct 27, 2022 | 3:39 PM

सिडनी: टी 20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीची धमाकेदार फलंदाजी कायम आहे. आज त्याने सलग दुसरं अर्धशतक झळकावलं. याआधी पाकिस्तान विरुद्ध तो 82 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळला होता. आज त्याने नेदरलँडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. विराटने सावध, संयमी सुरुवात केली होती. पण सूर सापडल्यानंतर त्याने नेदरलँडच्या गोलंदाजांची धुलाई केली.

या फटक्याने चाहत्यांच लक्ष वेधलं

विराटने 44 चेंडूत नाबाद 62 धावा फटकावताना 3 चौकार आणि 2 षटकार लगावले. विराटने आज 37 चेंडूत हाफ सेंच्युरी झळकावली. त्याने सिंगल काढून अर्धशतक पूर्ण केलं. ही धाव घेण्याआधी त्याने खेळलेल्या फटक्याने चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं.

Reaction पाहण्यासारखी

सुरुवातीला विराट कोहलीचा थोडा संघर्ष सुरु होता. पण नंतर त्याने व्यवस्थित लय पकडली. 17 व्या ओव्हरमध्ये डावखुरा वेगवान गोलंदाज फ्रेड क्लासेनच्या गोलंदाजीवर षटकार मारला. या शॉटनंतर त्याची Reaction पाहण्यासारखी होती.

रोहित आणि विराटने दुसऱ्याविकेटसाठी 73 धावांची भागीदारी केली. रोहित बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव क्रीजवर आला. दोघांनी मिळून जबरदस्त बॅटिंग केली. सूर्यकुमारने नेहमीच्या स्टाइलमध्ये चौफेर फटकेबाजी केली. त्याने 25 चेंडूत 51 धावा फटकावताना 7 चौकार आणि 1 षटकार लगावला.