मी त्या पत्रकाराचं नाव घेणार नाही, BCCI ने विचारलं तरी सांगणार नाही : ऋद्धिमान साहा

| Updated on: Feb 22, 2022 | 10:06 AM

ऋद्धिमान साहाने (Wriddhiman Saha) अद्याप बीसीसीआयला (BCCI) त्या पत्रकाराचे नाव सांगितले नाही ज्याने त्याच्यावर मुलाखतीसाठी दबाव आणला होता आणि त्याच्याशी असभ्य वर्तन केले होते. याहून मोठी गोष्ट म्हणजे यापुढेही तो त्या पत्रकाराचे (Journalist) नाव उघड करणार नाही.

मी त्या पत्रकाराचं नाव घेणार नाही, BCCI ने विचारलं तरी सांगणार नाही : ऋद्धिमान साहा
Wriddhiman Saha (Image Credit: AFP)
Follow us on

मुंबई : ऋद्धिमान साहाने (Wriddhiman Saha) अद्याप बीसीसीआयला (BCCI) त्या पत्रकाराचे नाव सांगितले नाही ज्याने त्याच्यावर मुलाखतीसाठी दबाव आणला होता आणि त्याच्याशी असभ्य वर्तन केले होते. याहून मोठी गोष्ट म्हणजे यापुढेही तो त्या पत्रकाराचे (Journalist) नाव उघड करणार नाही. आता बीसीसीआयने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे ठरवले आहे. त्याच्या चौकशीत पत्रकाराचे नावही समाविष्ट केले जाणार आहे. पण साहा मौन मोडणार नाही. म्हणजे हा मुद्दा आता मोठ्या चर्चेचा विषय होऊ शकतो. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या मीडिया रिपोर्टनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ साहाला मुलाखतीसाठी व्हॉट्सअॅप मेसेज पाठवणाऱ्या पत्रकाराचे नाव विचारू शकते.

साहाने आपल्या ट्विटर हँडलवर त्या व्हॉट्सअॅप मेसेजचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. यासोबतच पत्रकारितेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. साहाच्या या ट्विटनंतर त्याला भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री, माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग, माजी फिरकीपटू हरभजन सिंग यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

BCCI ने विचारले तरी मी नाव सांगणार नाही : साहा

साहाने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, मी त्या पत्रकाराचे नाव उघड करणार नाही. तो म्हणाला, बीसीसीआयने अद्याप माझ्याशी बोलणे केलेले नाही. जर त्यांनी मला नाव विचारले तर मी म्हणेन की कोणाचेही करिअर उद्ध्वस्त करण्याचा किंवा त्यांचा अपमान करण्याचा माझा हेतू नाही. म्हणूनच मी ट्विटमध्येदेखील त्या पत्रकाराचे नाव घेतले नाही. माझ्या पालकांनी मला हे शिकवले नाही. माझ्या ट्विटचा मुख्य उद्देश एवढाच होता की मीडियामध्ये असे काही लोक आहेत जे अशा प्रकारचं काम करतात.

साहा म्हणाला, मी ट्विटमध्ये नाव सांगितले असते तर योग्ट ठरले नसते. हे कोणी केले आहे त्याबाबत लोकांना कल्पना आहे. मी ते ट्विट केले कारण इतर खेळाडूंच्या बाबतीत असे घडू नये. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की, त्यांनी जे काही केलं ते चुकीचं आहे. आणि कोणीही त्याची पुरावृत्ती करु नये.

श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियात निवड न झाल्याने प्रकरण पेटलं

ऋद्धिमान साहाला श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी संघात स्थान न दिल्याने या संपूर्ण प्रकरणाने पेट घेतला. त्याची एक मुलाखत पटकन चर्चेचा विषय बनली, ज्यामध्ये त्याने राहुल द्रविड आणि सौरव गांगुलीबद्दल मोठमोठी वक्तव्ये केली होती.

संबंधित बातम्या

IND vs SL:’जो पर्यंत मी BCCI मध्ये आहे, तो पर्यंत तू संघामध्ये राहशील’, साहाचा सौरव गांगुलीबद्दल धक्कादायक खुलासा

Wriddhiman Saha च्या ट्विट, इंटरव्ह्यूप्रकरणी BCCI ॲक्शन मोडवर, दोषींवर कारवाई करणार

Wriddhiman Saha: ऋद्धीमान साहाच्या आरोपावर राहुल द्रविड यांनी सोडलं मौन, म्हणाले…