Wriddhiman Saha च्या ट्विट, इंटरव्ह्यूप्रकरणी BCCI ॲक्शन मोडवर, दोषींवर कारवाई करणार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे. बीसीसीआय आता या प्रकरणी कारवाई करण्याच्या मनस्थितीत आहे. मंडळाने भारतीय यष्टीरक्षकाची (Indian Wicketkeeper) मुलाखत आणि त्यानंतरचे ट्विट तपासण्याचे ठरवले आहे.

Wriddhiman Saha च्या ट्विट, इंटरव्ह्यूप्रकरणी BCCI ॲक्शन मोडवर, दोषींवर कारवाई करणार
Wriddhiman Saha (Image Credit: AFP)
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 10:27 AM

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे. बीसीसीआय आता या प्रकरणी कारवाई करण्याच्या मनस्थितीत आहे. मंडळाने भारतीय यष्टीरक्षकाची (Indian Wicketkeeper) मुलाखत आणि त्यानंतरचे ट्विट तपासण्याचे ठरवले आहे. बोर्ड साहाच्या ट्विट्समध्ये स्क्रीनशॉट म्हणून जोडलेल्या त्या व्हॉट्सअॅप मेसेजेसचीदेखील तपासणी करेल, जे त्याला पत्रकारांनी पाठवले आहेत. या प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावरही भारतीय क्रिकेट बोर्ड कारवाई करेल. टाइम्स ऑफ इंडियाने साहा प्रकरणात बीसीसीआयच्या हस्तक्षेपाची ही बातमी प्रसिद्ध केली आहे. सूत्रांनी त्यांना सांगितले की, “बोर्ड हे प्रकरण हलक्यात घेणार नाही. ते या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहेत. साहाने मुलाखतीत जे काही सांगितले आणि त्यानंतर त्याने जे ट्विट्स केले. बोर्ड त्याच्या मुळापर्यंत जाईल.”

आपल्या तपास प्रक्रियेदरम्यान, बीसीसीआय हे देखील शोधण्याचा प्रयत्न करेल की, यापूर्वी कोणत्याही क्रिकेटपटूला अशा परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे का? बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने TOI ला सांगितले की, “साहा हा अशा खेळाडूंपैकी एक आहे ज्याचा बोर्डाशी करार आहे. अशा परिस्थितीत बोर्ड आपल्या खेळाडूंना एकटं पडू देणार नाही. या प्रकरणामागे कोण आहे त्याचीही चौकशी केली जाईल, असं बोर्डाने म्हटलं आहे.

गांगुलीकडून दिलासा, तरिही संघातून हकालपट्टी

ऋद्धिमान साहा (Wriddhiman Saha) आता भारतीय क्रिकेट संघाचा भाग नाहीय. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऋद्धिमान साहाला संघातून डच्चू देण्यात आला आहे. संघ निवडीमध्ये त्याचा विचार झालेला नाही. कसोटी संघात स्थान न मिळाल्यामुळे ऋद्धिमान साहा संतप्त झाला आहे. प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्याने धक्कादायक खुलासे केले आहेत. BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या संदर्भातही ऋद्धिमान साहाने वक्तव्य केलं आहे. ऋद्धिमान साहाने जे दावे केलेत, त्यामुळे नवीन वाद निर्माण होऊ शकतो. कानपूर कसोटीनंतर साहाला सौरव गांगुलीकडून (Sourav Ganguly) दिलासा मिळाला होता. सौरव गागुंलीकडून त्याला आश्वासन मिळालं होतं. पण तसं घडलं नाही. त्यामुळे त्याने मीडियासमोर येऊन खळबळजनक विधानं केली आहेत, ज्यातून नवीन वाद निर्माण होईल.

सौरव गांगुलीचा साहाला मेसेज

कानपूर कसोटीत मी न्यूझीलंड विरुद्ध नाबाद 61 धावांची खेळी केली. त्यावेळी सौरव गांगुली यांच्याकडून मला एक व्हॉट्स अॅप मेसेज आला होता. त्यामध्ये ‘जो पर्यंत मी BCCI मध्ये आहे, तो पर्यंत तू संघामध्ये राहशील’ असं लिहिलं होतं. सौरव गांगुलीकडून आलेल्या त्या मेसेजने माझा आत्मविश्वास वाढवला. पण आता अचानक सर्वकाही बदललं आहे, असं ऋद्धिमान साहाने सांगितलं.

इतर बातम्या

IND vs WI : सूर्यकुमारची आतषबाजी, भारताचा विंडिजवर क्लीन स्विप विजय, ICC T20 रॅकिंग्समध्ये पहिल्या स्थानवर कब्जा

IND vs WI : वेस्ट इंडिजचा कंजूष गोलंदाज, ज्याच्यासमोर रोहित-इशान आणि विराटही हतबल

IND vs WI : पहिल्या 5 चेंडूत 2 DRS, दोन्ही सक्सेसफुल, पण फायदा टीम इंडियालाच! नेमकं घडलं काय?

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.