झिम्बाब्वेचा संघ घोषित, टीमला मिळाला 37 वर्षींय कर्णधार

| Updated on: Sep 16, 2022 | 3:52 PM

झिम्बाब्वेचा संघ घोषित करण्यात आला आहे. यात कुणाला संधी मिळाली, कुणाला डावललं, ते जाणून घ्या...

झिम्बाब्वेचा संघ घोषित, टीमला मिळाला 37 वर्षींय कर्णधार
zimbabwe cricket team
Image Credit source: social
Follow us on

मुंबई : टी-20 विश्वचषकाची उत्सुकता वाढत असताना, ही स्पर्धा जवळ येत असताना भारतासह इतर देशांनीही आपल्या संघाची घोषणा केली आहे. झिम्बाब्वेनं (Zimbabwe) आयसीसी पुरुष टी-20 (T20) विश्वचषक स्पर्धेसाठी (T20 World Cup 2022) 15 जणांचा संघ (Zimbabwe Cricket Team) जाहीर केलाय. 37 वर्षीय क्रेग एरविनची संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज आशीर्वाद मुजारबानी विश्वचषकासाठी परतला आहे. झिम्बाब्वेला सुपर 12 मध्ये जाण्यासाठी गट फेरीत खेळाव लागणार आहे. झिम्बाब्वे ब गटात आहे. यात आयर्लंड, स्कॉटलंड आणि वेस्ट इंडिजच्या संघाचा समावेश आहे. आता हे सगळं असलं तरी क्रिकेटप्रेमींना झिम्बाब्वेच्या 37 वर्षीय क्रेग एरविनविषयी कुतूहल वाटतंय.

आयीसीचं ट्विट पाहा

T20 विश्वचषक संघ

क्रेग एर्विन (क), रायन बर्ल, रेगिस चकाब्वा, तेंडाई चतारा, ब्रॅडली इव्हान्स, ल्यूक जोंगवे, क्लाइव्ह मदांडे, वेस्ली मधेवेरे, वेलिंग्टन मसाकादझा, टोनी मुन्योंगा, ब्लेसिंग मुझाराबानी, रिचर्ड शुकाबवा, मिल्कानबानी शॉन विल्यम्स

राखीव खेळाडू

तनाका चिवांगा, इनोसंट कैया, केविन कासुझा, तादिवानाशे मारुमणी, व्हिक्टर न्याउची

महत्वाच्या तारखा

  1. झिम्बाब्वेचा टी-20 विश्वचषकातील प्रवास 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
  2. ब गटातील त्यांचा पहिला सामना आयर्लंडशी होणार आहे. हा सामना होबार्ट येथे होणार आहे.
  3. 19 ऑक्टोबरला वेस्ट इंडिज आणि 21 ऑक्टोबरला स्कॉटलंडशी होणार आहे. या गटातील अव्वल दोन संघांचा सुपर 12 मध्ये समावेश केला जाईल.
  4. विश्वचषकापूर्वी झिम्बाब्वेचा संघ 10 आणि 13 ऑक्टोबर रोजी श्रीलंका आणि नामिबियाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे.
  5. अ गटात श्रीलंका, यूएई, नेदरलँड आणि नामिबिया यांचा समावेश आहे.
  6. गट फेरीनंतर सुपर 12 फेरी सुरू होईल. T20 च्या टॉप 8 संघांना सुपर 12 मध्ये थेट प्रवेश मिळाला आहे.

यांना मिळाली संधी

संघाचा कर्णधार क्रेग एरविनही दुखापतीनंतर पुनरागमन करत आहे. त्याला हॅमस्ट्रिंग होते. क्रेग व्यतिरिक्त तेंडाई चतारा, वेलिंग्टन मस्काडझा आणि मिल्टन शुंभा हे देखील दुखापतीतून पुनरागमन करत आहेत. चताराच्या कॉलरबोनला फ्रॅक्चर झालंय. संघात रेगिस चकाबवा, सिकंदर रझा आणि शॉन विल्यम्ससारखे दिग्गज खेळाडू आहेत. ब्रॅडली इव्हान्स, टोनी मुन्योंगा आणि क्लाइन मदनडे यांनाही संधी मिळाली आहे. संघानं पाच राखीव खेळाडूंची नावही जाहीर केलंय. तादिवानसे मारुमणी, इनोमेंट काय, केविन कासुजा, व्हिक्टर न्याची आणि तनकम चिवांगा हे राखीव खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियाला संघासोबत जाणार आहे.