IPL 2023: अनिल कुंबळेंच्या जागी पंजाब किंग्सकडून नव्या हेड कोचची नियुक्ती

IPL 2023: इंडियन प्रीमियर लीगमधील फ्रेंचायजी पंजाब किंग्सने आपला कोच बदलला आहे. पुढच्या सीजनसाठी पंजाब किंग्सने नव्या कोचच्या नावाची घोषणा केली आहे.

IPL 2023: अनिल कुंबळेंच्या जागी पंजाब किंग्सकडून नव्या हेड कोचची नियुक्ती
Anil-KumbleImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Sep 16, 2022 | 3:21 PM

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगमधील फ्रेंचायजी पंजाब किंग्सने आपला कोच बदलला आहे. पुढच्या सीजनसाठी पंजाब किंग्सने नव्या कोचच्या नावाची घोषणा केली आहे. पंजाब किंग्सने ट्रेवर बेलिस यांची हेड कोच पदावर नियुक्ती केली आहे. ट्रेवर बेलिस यांच्याच मार्गदर्शनाखाली इंग्लंडने आपला पहिला वर्ल्ड कप जिंकला आहे. बेलिस माजी कोच आणि महान लेग स्पिनर अनिल कुंबळे यांची जागा घेणार आहेत. पंजाब किंग्सने टि्वट करुन ही माहिती दिलीय.

पंजाबचा विजेतेपदाचा दुष्काळ संपणार?

पंजाबची टीम पहिल्या सीजनपासून म्हणजे 2008 पासून आयपीएल खेळत आहे. पण अजूनपर्यंत एकदाही त्यांना विजेतेपद मिळवता आलेलं नाही. 2014 मध्ये पंजाबची टीम फायनलमध्ये पोहोचली होती. पण त्यांना विजेतेपदाने हुलकावणी दिली. बेलिस यांच्या येण्याने विजेतेपदाच दुष्काळ संपेल, अशी पंजाब टीम मॅनेजमेंटची अपेक्षा असेल.

आयपीएलमध्ये शानदार रेकॉर्ड

बेलिस यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडने 2019 मध्ये पहिला वर्ल्ड कप जिंकला. 2007 मध्ये श्रीलंकन टीमचे ते मुख्य कोचही होते. त्याचवर्षी श्रीलंकेची टीमही वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहोचली होती. पण ऑस्ट्रेलियाने त्यांना पराभूत केलं होतं. आयपीएलमध्ये कोचिंग करण्याची त्यांची पहिली वेळ नाहीय. यापूर्वी ते कोलकाता नाइट रायडर्सचे कोच होते. त्यावेळी दोनवेळा कोलकाता टीमने आयपीएलचे जेतेपद मिळवलं.

सनरायजर्स हैदराबादचे कोच होते

कोलकाताच्या टीमने 2012 आणि 2014 यावर्षी आयपीएलच विजेतेपद मिळवलं होतं. त्यावेळी बेलिस टीमचे मुख्य कोच होते. इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर ते पुन्हा आयपीएलमध्ये परतले होते. सनरायजर्स हैदराबादचे कोच होते. त्यावर्षी हैदराबादने प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतरच्या सीजनमध्ये टीमची कामगिरी चांगली झाली नाही.म्हणून फ्रेंचायजीने बेलिस यांना हटवलं.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.